‘The Kerala Story’चा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले…


‘’आता काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांचे पाय थरथर कापत आहेत, त्यामुळे…’’ असंही मोदींनी म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

केरळ : बजरंग दलावर बंदी घालण्याच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानंतर भाजपाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. असे असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘The Kerala Story’ या  बहुचर्चित चित्रपटाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. Referring to The Kerala Story PM Modi targeted Congress

कर्नाटकातील बल्लारी येथील जाहीर सभेला संबोधित करताना ते मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासने आहेत. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ताळेबंदी आणि तुष्टीकरणाचा गठ्ठा आहे. आता काँग्रेसची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांचे पाय थरथर कापत आहेत, त्यामुळे काँग्रेसचा मी जय बजरंगबली म्हणण्यावर आक्षेप आहे.

याचबरोबर पीएम मोदींनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचाही उल्लेख केला आणि मोदी म्हणाले की, ‘’काँग्रेस आपल्या व्होट बँकेसाठी दहशतवादाला बळी पडल्याचे पाहून मला आश्चर्य वाटते. असा पक्ष कर्नाटकला कधी वाचवू शकेल का? दहशतीच्या वातावरणात येथील उद्योग, आयटी उद्योग, शेती,  वैभवशाली संस्कृती नष्ट होईल. गेल्या काही वर्षांत दहशतवादाचा आणखी एक भयानक प्रकार समोर आला आहे. बॉम्ब, बंदुका, पिस्तुलांचे आवाज ऐकू येतात, पण समाजाला आतून पोकळ करण्याच्या दहशतवादी कारस्थानाचा आवाज येत नाही.’’

याचबरोबर ‘’केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा खुलासा ‘द केरळ स्टोरी’या चित्रपटात केला आहे. परंतु देशाचं दुर्दैव बघा की काँग्रेस, आज समाजाला उध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीसोबत उभी राहिल्याचे दिसत आहे.‘’  असंही मोदींनी म्हटलं आहे.

Referring to The Kerala Story PM Modi targeted Congress

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात