विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात लाल किल्यावर झालेला हल्ला आणि विटंबना याचा अनुभव असल्याने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ला कडकोट करण्यात आला आहे. कंटेनरची तात्पुरती भिंत उभारण्यात आली आहे.Red Fort security, Container temporary wall erected in front of Red Fort on the backdrop of Independence Day
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतात. त्यामुळे सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. चांदनी चौक भागातून कोणीही लाल किल्ल्यामध्ये पाहू शकत नाही. पोलिसांनी लाल किल्ल्यासमोर एवढी मोठी भिंत उभी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या कंटेनरवर विविध प्रकारची चित्रे काढून सजावट करण्यात आलेली आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोर हे कंटेनर अशा प्रकारे ठेवण्यात आले आहेत की कोणीही व्यक्ती या मुघलकालीन परिसरामध्ये पाहू शकत नाही.प्रजासत्ताकदिनी शेकडो आंदोलक लाल किल्यात घुसले होते.
कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणाºया आंदोलकांनी एक धार्मिक ध्वजही लावला होता. २६ जानेवारी २०२१ रोजी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये चकमकही झाली होती. यावेळच्या हिंसाचारात ३९४ पोलीस जखमी झाले होते.
त्यामुळे दिल्लीत पोलिसांनी ड्रोन, पॅराग्लायडर व उष्ण हवेचे फुगे यासारख्या हवाई वस्तू उडविण्यावर बंदी घातली होती. हा आदेश १६ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. मागील सोमवारी गस्ती पथकाला विजय घाटजवळ एक ड्रोन दिसले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App