सरकारी यंत्रणेत शिरकाव करून कट्टरता पसरविण्याचा विशिष्ठ समाजाचा डाव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वार्षिक अहवालात इशारा


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : राज्यघटना आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली देशात कट्टरता तसेच जातीय उन्माद पसरवला जात असून आपले इप्सित साध्य करण्यासाठी सरकारी यंत्रणेत शिरकाव करण्याची विशिष्ट समुदायाची योजना आहे, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या वार्षिक अहवालात दिला आहे.Rashtriya Swayamsevak Sangh’s annual report warns of specific society’s ploy to spread bigotry by infiltrating government

देशातील फुटीरतावादी शक्तींचा वाढता प्रभाव हे मोठा आव्हान आहे. जसजसा जनगणनेचा काळ जवळ येतो तसे, आम्ही हिंदू नाही हे सांगण्यासाठी समुदायांना उद्युक्त केले जाते असेही या अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल संघाच्या प्रतिनिधी सभेत सादर करण्यात आला.धार्मिक कट्टरता हे आव्हान आहे हे नमूद करताना, कर्नाटकमध्ये हिजाबच्या वादात एका हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकत्यार्ची हत्या झाल्याचा तसेच केरळचा संदर्भ दिला आहे. सरकारी यंत्रणेत शिरकाव करून आपले दीर्घकालीन हेतू साध्य करणे हा विशिष्ट समुदायाचा उद्देश आहे. मात्र समाजाला जागरूक करून याचा मुकाबला करावा, असे अहवालात म्हटले आहे.

Rashtriya Swayamsevak Sangh’s annual report warns of specific society’s ploy to spread bigotry by infiltrating government

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती