राममंदिरासाठी देणगी अभियानामुळे देश श्रीरामांशी भावनिकदृष्टया जोडला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वास

राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याच्या अभियानामुळे देश अजूनही श्रीरामांशी भावनिकदृष्ट्या जोडला गेला आहे. राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. Donation campaign for Ram Mandir connects country emotionally with Shri Ram, believes Rashtriya Swayamsevak Sangh


विशेष प्रतिनिधी

बेंगळुरू: राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याच्या अभियानामुळे देश अजूनही श्रीरामांशी भावनिकदृष्ट्या जोडला गेला आहे. राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या बैठकीत राम मंदिराचा विषय आला. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र स्थापन करण्यात आले.अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याचे देशव्यापी अभियान हाती घेण्यात आले. देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आलेल्या या घटनेमुळे भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील. या अभियानात संघ पोहोचू शकला नाही, अशा ठिकाणी नागरिकांनी स्वत: बोलावून राम मंदिरासाठी देणग्या दिल्या. हा उत्साह ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल, असे या बैठकीदरम्यान सांगण्यात आले.

या बैठकीत संघ कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या सेवाभावी कार्यासाठी समाधान व्यक्त करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातही देशवासीयांची एकजूटता पाहायला मिळाली. एकत्रितपणे देश या संकटाशी सामना करण्यासाठी सज्ज झाला, याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

धर्मांतरण आणि लव्ह जिहाद विरोधी कायद्याचे संघाकडून यावेळी समर्थन करण्यात आले. संघाचे नवीन सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी सांगितले की, बौद्धिक अभियानाच्या माध्यमातून यासंदर्भातील कायदा आणि विचार पोहोचवणे आवश्यक आहे. आम्ही लव्ह जिहाद या शब्दाचा वापर करत नाही. न्यायालयाकडून असे शब्द वापरले जातात. कोणत्याही चुकीच्या उद्देशाने मुलींना प्रलोभने देऊन त्यांच्याशी विवाह करणे आणि त्यानंतर धर्मांतरण करणे या प्रवृत्तीला विरोध व्हायला हवा.

Donation campaign for Ram Mandir connects country emotionally with Shri Ram, believes Rashtriya Swayamsevak Sangh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*