विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: काँग्रेस आणि राहुल गांधींनी अनावश्यक राफेल लढाऊ विमानांचा मुद्दा उचलला. त्याचा परिणाम काय झाला? राफेल विमान फ्रान्समध्ये तयार झालं आहे. भारतात लँडही केलं आहे. पण अजूनही राहुल गांधी टेक ऑफ करू शकले नाहीत, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे.Raphael landed but Rahul Gandhi could not take off, Criticism of Rajnath Singh
राजनाथ सिंह म्हणाले, राहुल गांधींनी आपली ऊर्जा आणि वेळ एका मर्यादेपर्यंतच खर्च करायला हवी. एक राजकीय कार्यकर्ता म्हणून आपण विरोधकांचा सन्मान केला पाहिज. विरोधकांवर हात धुवून कुणी मागे लागलं तर त्याचा परिणाम ‘राहुल गांधी’ असा होता. लोकशाहीत विरोध करण्यात काहीच हरकत नाही. पण फक्त विरोधासाठी विरोध करण्याचा प्रयत्न केला जातोय. यातूनच संसदेचं संपूर्ण पावसाळी अधिवेशन चालू दिले गेले नाही.
राजनाथ सिंह म्हणाले, देशाची धोरणं आखताना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ कसा पोहोचेल हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. काँग्रेसने गांधीजींच्या नावाचा दुरुपयोग केला. एवढचं नव्हे तर गांधी नावही ठेवलं.
पण गांधीजींचं काम सोडून दिलं. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास हाच भाजप आणि जनसंघाचा मूळ मंत्र आहे. मानवता आणि अंत्योदयाचे विचार आपल्याला पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी राजकीय परंपरा आणि संस्काराच्या रुपाने दिली आह.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, देशात एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही आणि केंद्रातील भाजपा सरकारला दहशतवादी घाबरत आहे.
काहीही झाले तरी आम्ही दहशतवाद्यांना यशस्वी होऊ देणार नाही. जम्मू -काश्मीरला विसरून जा, मोदींच्या आगमनानंतर देशाच्या कोणत्याही भागात मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही. ही आमची मोठी कामगिरी आहे.
गुजरातमध्ये भाजपच्या दीर्घकाळ यशाचे कारण ‘लोक लाडके’ पंतप्रधान मोदी आहेत. आधी १३ वर्षे मुख्यमंत्री म्हणून आणि आता ७ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी मोठी कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App