उत्तरांखडची पारंपरिक काळी टोपी राहूल गांधी यांना आरएसएसची वाटते, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उत्तराखंडमधील लोकांची पारंपरिक टोपी असलेली माझी काळी टोपी रा.स्व. संघाशी संबंधित असल्याचे राहुल गांधी यांना वाटते, तसेच वीर सावरकर हे संघ स्वयंसेवक होते अशीही त्यांची समजूत आहे, अशी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.Rahul Gandhi thinks Uttarakhand’s traditional black cap belongs to RSS, criticizes Governor Bhagat Singh Koshyari

भारतीय संसद मे भगतसिंह कोश्यारी या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत मला तुम्ही काळी टोपी का घालता? असा प्रश्न केला होता. उत्तराखंडमधील नागरिकांची ही टोपी आहे असे उत्तर त्यांना दिले होते. त्यावर तुम्ही संघाचे आहात म्हणून ती टोपी वापरता असे राहुल म्हणाले होते. त्यावर मी संघाचा आहे मात्र ही टोपी उत्तराखंडची आहे असे उत्तर राहुल यांना दिल्याचे कोश्यारी यांनी भाषणात नमूद केले.संघाचा उदय होण्यापूवीर्पासून ही टोपी वापरली जाते असे कोश्यारी यांनी स्पष्ट केले. काही महिन्यांनंतर पुन्हा राहुल यांनी त्यांचाच मुद्दा लावून धरल्याची आठवण कोश्यारी यांनी सांगितली. अशा लोकांबरोबर तुम्हा संसदेत कामकाज करावे लागेल असे त्यांनी गोयल यांच्याकडे पाहात स्पष्ट केले.

Rahul Gandhi thinks Uttarakhand’s traditional black cap belongs to RSS, criticizes Governor Bhagat Singh Koshyari

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती