रामदास आठवले म्हणाले, सरकार पाडायचे असते तर सगळ्या आमदारांच्या चौकश्या लावल्या असत्या

विशेष प्रतिनिधी

लोणावळा : सरकार पाडायच असतं तर सर्व आमदारांच्या चौकश्या लावल्या असत्या. केंद्रीय तपास यंत्रणा आणि सरकारचा संबंध नाही. त्यामुळे एकमेकांवरील आरोप थांबवा, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.Ramdas Athavale said that if the government was to be overthrown, all the MLAs would have been questioned

आठवले म्हणाले, सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी पक्ष आणि भाजपा यांच्यात दररोज आरोप प्रत्यारोप होत आहेत. ते एकमेकांची उनी दुनी काढत आहेत. हे आरोप प्रत्यारोप थांबले पाहिजे. भाजपा आणि शिवसेनेच्या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे.आठवले म्हणाले की, आरोप प्रत्यारोप राजकारणात होत असतात. हे कुठं तरी थांबवलं पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालायला हवं. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. सत्तेचा उपयोग आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नागरिकांच्या कल्याणासाठी करणं आवश्यक आहे.

विरोधी पक्ष म्हणून आरोप केल्यास त्याला भाजपा नेते उत्तर देण्यास खंबीर आहेत. परंतु, हे थांबलं पाहिजे. हा वाद मिटला पाहिजे. एकमेकांची बदनामी करू नये, हे माझं मत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या यंत्रणा स्वतंत्र आहेत. सरकारचा त्यांच्याशी काही संबंध नाही.

सरकार पाडायच असतं तर सर्व आमदारांच्या चौकश्या लावल्या असत्या. सरकार पाडण्याचा विषय नाही. सरकार पडणार नाही हे माहीत आहे. सरकार पाडण्यासाठी चौकशी लावली जाते, असं अजिबात नाही.संजय राऊत यांनी ईडीचा भ्रष्टाचार बाहेर काढावा. त्याच्याशी सरकारचा काही संबंध नाही.

Ramdas Athavale said that if the government was to be overthrown, all the MLAs would have been questioned

महत्त्वाच्या बातम्या