PUNJAB : मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न – Sonu Soodची कार पोलिसांनी केली जप्त ; घरा बाहेर पडल्यास केली जाणार कारवाई!

आज देशातील पंजाबमध्ये तिसऱ्या टप्प्यांतील निवडणूका पार पडले. दरम्यान अकाली दलाने अभिनेता सोनू सूदला स्वत:चा बूथ सोडून दुसऱ्या बुथवर गेल्याची तक्रार दाखल केली .


निवडणूक आयोगाकडून सोनू सूद विरोधात कारवाई करत त्याची कार जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे त्याला मतदान केंद्रावर जाण्यापासून देखील रोखण्यात आले. 


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सोनू सूद आपल्या सामाजिक कार्यामुळे नेहमी चर्चेत असतो. यावेळी तो पुन्हा चर्चेत आला आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या मतदानादरम्यान (Punjab Election 2022) सोनू सूदची कार जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनू सूदची कार (Sonu Soods Car) पोलिसांनी जप्त करून त्याला घरी पाठवण्यात आले. सोनू सूदवर मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, सोनू सूदची कार जप्त केली आहे त्याचप्रमाणे एसडीएम अधिकारी सतवंत सिंह यांनी सोनू सूदच्या घराचे पाहणी करण्याचे देखील निर्देश दिले आहेत.

सोनू सूदची बहिण मालविका मोगा मतदार संघातून निवडणूक लढत आहे. मोगा जिल्ह्याचे पीआरओ प्रभदीप सिंह यांनी म्हटले आहे की, सोनू सूद मतदान केंद्राच्या आत जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याची कार जप्त करुन त्याला घरी पाठवण्यात आले. तो घराबाहेर पडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.

या प्रकरणावर सोनू सूदने खुलासा केला, विरोधक अकाली दलाच्या काही लोकांकडून विविध मतदान केंद्रावर धमकीचे फोन आल्याची माहिती आम्हाला मिळाली. काही मतदान केंद्रांवर पैसे वाटत जात आहेत, असे देखील कळाले. त्यामुळे निष्पक्ष निवडणूका होत आहेत की नाही हे पाहणे आमचे कर्तव्य आहे आणि ते पार पाडण्यासाठी आम्ही तिथे गेले होतो. पण त्यांच्या कारवाईनंतर आम्ही घरी आलो आहोत. निष्पक्ष निवडणूका व्हाव्यात हीच आम्ची इच्छा आहे असे सोनू सूद म्हणाला.

 

Sonu Sood’s car seized by police in Punjab