वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी आठ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. त्यामध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना नियुक्त केले आहे. ते या अगोदर गोव्याचे राज्यपाल होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी राज्यपालांच्या नियुक्तीला महत्व आले आहे. कर्नाटक आणि हरियानासह आठ राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार थवरचंद गहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल असतील.
नवनियुक्त राज्यपालांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांचा परिचय
राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे गोव्याचे रहिवासी आहेत. आर्लेकर हे गोवा सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. त्यांनी गोवा विधानसभेचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. २ एप्रिल १९५४ रोजी गोव्याच्या पणजी येथे जन्मलेल्या ६७ वर्षीय राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या कुटुंबात पत्नी व दोन मुले आहेत.
राजेंद्र आर्लेकर हे २०१२ ते २९१५ पर्यंत गोवा विधानसभेचे अध्यक्ष होते. ते ऑक्टोबर २०१५ ते २०२७ पर्यंत वन पर्यावरण आणि पंचायती राजमंत्रीही राहिले आहेत. २००२ ते २००७ या कालावधीत ते विधानसभेत आमदार होते. जुलै २०२१ मध्ये त्यांना गोव्याचे राज्यपाल बनविले होते. आता राष्ट्रपतींनी त्यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App