काँग्रेसला आणखी एक हादरा, नेत्यांचे आउटगोईंग सुरुच, आता प्रणव मुखर्जींचे पुत्र तृणमूलमध्ये


विशेष प्रतिनिधी

कोलकता – दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. Congress gets jolt in west Bengal

अभिजित यांनी पित्याच्या जांगीपूर मतदारसंघातून दोन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. मागील निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. अभिजित मुखर्जी यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसला आणखी एक हादरा बसला आहे.



गेल्या काही वर्षांत ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, हिमंता बिस्व सरमा अशा काही प्रमुख नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या तुलनेत अभिजित यांचा ताकदवान नेते असा लौकिक नसला तरी पश्चिम बंगाल काँग्रेसची स्थिती आणखी कमकुवत झाली आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. इतिहासात प्रथमच त्यांच्यावर भोपळा मिळण्याची नामुष्की आली.

काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाबद्दल मुखर्जी म्हणाले की, प्रमुख सदस्यत्व सोडले तर मला पक्षाच्या कोणत्याही समितीत किंवा पदावर घेण्यात आले नाही. त्यामुळे एक सैनिक म्हणून तृणमूलमध्ये दाखल होण्याचा निर्णय मी घेतला. तृणमूलच्या सूचनांनुसार मी कार्य करेन. एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता कायम राखण्यासाठी मी झटेन.

Congress gets jolt in west Bengal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात