वृत्तसंस्था
बलिया : समाजवादी पक्षाबरोबरील आमची आघाडी सत्तेवर आल्यास उत्तर प्रदेशात जातीनिहाय जनगणना करू आणि संख्येनुसार सर्व वर्गांना प्रतिनिधित्व देऊ, असे आश्वासन सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी दिले. Rajbhar assure casewise census
आघाडी जिंकल्यास अखिलेश यादव मुख्यमंत्री होतील, असेही त्यांनी नमूद केले. याआधी राजभर यांनी पाच मुख्यमंत्री आणि २० उपमुख्यमंत्र्यांना आळीपाळीने पदे देण्याची कल्पना मांडली होती. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, संकल्प भागीदारी मोर्चा सत्तेवर आल्यास हे विधान लागू होणार होते. भाजपला हटविणे आणि अखिलेशना मुख्यमंत्री बनविणे हे आमचे ध्येय आहे.
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी युतीच्या शक्यतेबाबत राजभर यांनी स्पष्ट केले की, ओवेसी यांनी आधी सपाबरोबरील युतीविषयी ठरवावे. त्यांनी शंभर जागा मागितल्या तर युती कशी होणार हे तुम्हीच सांगा.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App