राजस्थानात काँग्रेसच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- वृद्ध मेले तरी हरकत नव्हती, बालकांचे लसीकरण आधी व्हायला हवे

Rajasthan Minister Bd Kalla says Senior Citizen May Die But first Youth And Children given Jabs of Corona vaccine

Rajasthan Minister Bd Kalla : एकीकडे देशात कोरोना महामारीचा धोका आहे आणि दुसरीकडे राजकारण्यांची वक्तव्ये सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. कोरोना कालावधीत अनेक राजकारण्यांनी महामारीसंबंधित अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. आता राजस्थानचे जल व ऊर्जामंत्री बीडी कल्ला यांचे नाव या यादीत समाविष्ट झाले आहे. Rajasthan Minister Bd Kalla says Senior Citizen May Die But first Youth And Children given Jabs of Corona vaccine


विशेष प्रतिनिधी

जोधपूर : एकीकडे देशात कोरोना महामारीचा धोका आहे आणि दुसरीकडे राजकारण्यांची वक्तव्ये सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. कोरोना कालावधीत अनेक राजकारण्यांनी महामारीसंबंधित अनेक वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. आता राजस्थानचे जल व ऊर्जामंत्री बीडी कल्ला यांचे नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.

राजस्थान सरकारमधील मंत्री बीडी कल्ला यांनी लसीकरणाबद्दल एक अनोखे ज्ञान पाजळले आहे. जलमंत्री बीडी कल्ला म्हणाले की, ही लस कोणाला मिळते हे आपणास ठाऊक आहे. आजपर्यंत आपल्या देशात कोणतीही लस फक्त मुलांनाच लस मिळालेली आहे, ज्येष्ठांना लस कुठे देतात?

ते पुढे म्हणाले की, कोरोनामध्येही प्रथम मुलांना लसीकरण करायला हवे, कारण लहान मुलं जगणं आवश्यक आहे. बीडी कल्ला म्हणाले की, मोदी सरकारने वृद्धांना कोरोना लस देण्यास सुरुवात केली. मंत्री पुढे म्हणाले की, मी स्वतः ज्येष्ठांना हे बोलताना ऐकले आहे की, आपण तरी 80-85 वर्षे वयाचे झालो आहोत, जरी आपण कोरोनामुळे मेलो तरी काही फरक पडणार नाही, परंतु लहान मुले वाचणे आवश्यक आहे, म्हणूनच मुलांना प्रथम लसीकरण करायला हवे.

एवढेच नव्हे, तर मंत्री बीडी कल्ला यांनी मोदी सरकारच्या लसीकरण धोरणावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पीएम मोदी यांचे लसीकरण धोरण चुकीचे आहे, जर लस आली तर मुलांना प्रथम द्यावी, परंतु मोदी सरकारने तसे केले नाही, ज्यामुळे समस्या इतकी वाढली.

केंद्रीय मंत्र्यांचा पलटवार

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राजस्थानचे मंत्री बी.डी. कल्ला यांच्या विधानाची दखल घेतली आहे. ते म्हणाले की, लसीसंदर्भातील कॉंग्रेस नेत्याचे ज्ञान आणि विधान हास्यास्पद आहे. ते पुढे म्हणाले की, लसीच्या राजकारणापासून कॉंग्रेस आता विदूषकाच्या राजकारणाकडे वळली आहे.

Rajasthan Minister Bd Kalla says Senior Citizen May Die But first Youth And Children given Jabs of Corona vaccine

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात