राज बब्बर सोडणार कॉँग्रेसचा हात, समाजवादी पक्षात करणार प्रवेश


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. उत्तर प्रदेशचे कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि अभिनेते राज बब्बर यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.Raj Babbar will leave Congress, will join Samajwadi Party

समाजवादी पक्षाचे प्रवक्ते फखरूल हसन चांद यांनी एक सूचक ट्वीट करत राज बब्बर यांच्या घरवापसीचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि अभिनेता लवकरच पुन्हा समाजवादी होणार आहे, असे ट्वीट फखरूल यांनी केले आहे. त्याबाबत अद्याप राज बब्बर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.



राज बब्बर सपात गेल्यास काँग्रेससाठी हा दुसरा मोठा धक्का धरणार आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व उत्तर प्रदेशातील एक प्रमुख नेते आरपीएन सिंह यांनी दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राज बब्बर हे २०१९च्या लोकसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यानंतर राज बब्बर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची धुरा सोपवण्यात आल्यानंतर राज बब्बर हे फारसे सक्रिय दिसलेले नाहीत.

पक्षाच्या कार्यक्रमांपासूनही ते दूर राहतात. काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेला व पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी आग्रह धरणारा २३ नेत्यांचा एक गट ( जी-२३ ) काँग्रेसमध्ये आहे. या गटात बब्बर यांचेही नाव घेतले जाते.

राज बब्बर यांनी जनता दलातून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. ५ वर्षे ते जनता दलात होते. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. १९९४ मध्ये सपाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. मग २००४च्या लोकसभा निवडणुकीत ते समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले व प्रथमच लोकसभेत पोहचले.

सपात अमरसिंह यांचा प्रभाव वाढल्यानंतर २००६मध्ये ते सपातून बाहेर पडले व माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्यासोबत त्यांनी जनमोर्चा स्थापन केला. तो प्रयोग फसला मग २००८ मध्ये बब्बर हे काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशात सपाला मोठा धक्का दिला.

अखिलेश यादव हे २००९च्या लोकसभा निवडणुकीत कन्नौज आणि फिरोजाबाद या दोन्ही जागांवर निवडून आले होते. त्यानंतर फिरोजाबादची जागा त्यांनी सोडली. तिथे पोटनिवडणूक झाली असता सपाने अखिलेश यांची पत्नी डिंपल यादव यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून लढत राज बब्बर यांनी डिंपल यांचा तेव्हा पराभव केला होता.

२०१४ मध्ये राज बब्बर यांचा गाझियाबाद लोकसभा मतदारसंघात जनरल व्ही. के. सिंह यांनी पराभव केला. त्यानंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले. २०१६ मध्ये त्यांच्याकडे प्रदेशाध्यपदाची सूत्रेही सोपवण्यात आली होती. मात्र २०१७ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आणि नंतरच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी अपयश पडले.

Raj Babbar will leave Congress, will join Samajwadi Party

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात