वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात कोळसा टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असताना वीजनिर्मिती केंद्रापर्यंत तातडीने कोळसा पुरविण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. कोळशाच्या वाहतुकीसाठी रेल्वेने कंबर कसली असून सोमवारी सुमारे ४३०-४५० वरून दररोज लोड होणाऱ्या कोळसा रेकची संख्या ४४०-४५० च्या आसपास गेली आहे.Railways taken inishitive for transporting coal; 500 rakes will be delivered daily to the power plant
औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेने वीज प्रकल्पांमध्ये चोवीस तास कोळसा नेण्याची तयारी केली आहे. रेल्वे कोळसा टंचाईकडे ‘आणीबाणी’ ची परिस्थिती म्हणून हाताळत आहे.
सर्व परिमंडळ रेल्वेच्या मुख्य संचालकांना आणि मॅनेज ऑपरेशन कंट्रोल रूममध्ये चोवीस तास याबाबतच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच मंत्रालय आणि महाव्यवस्थापकांना तासिका बुलेटिन तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, दररोज लोड केलेल्या कोळसा रेकची संख्या सोमवारी सुमारे ४३०-४५० वरून सुमारे ४४०-४५० पर्यंत पोचली. सोमवारी १.७७ दशलक्ष टन कोळसा हलवण्यात आला, जो गेल्या वर्षी १.४८ दशलक्ष टन होता.
सुत्रांनी सांगितले की दिवसातून ५०० रेकची मागणी केली तर ती पोचविण्याची क्षमता रेल्वेमध्ये आहे.देशाच्या पूर्व भागातील कोळशाच्या खाणीतून आणि पूर्व मध्य रेल्वेद्वारे कोळशाचे मोठ्या प्रमाणात रेक येत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App