काश्मीर आणि भारतातील इतर शहरांदरम्यान सुरू होणार रेल्वे, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काश्मीर खोर्‍यासाठी भारतातील इतर शहरांतून ट्रेन कधी सुरू होणार याबाबत मोठा खुलासा केला आहे. पुढील वर्षापर्यंत काश्मीर खोरे देशाच्या इतर भागांशी जोडले जाईल, पण त्याआधी जम्मू आणि श्रीनगरला जोडणाऱ्या ट्रॅकचे काम पूर्ण होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.Railway to start between Kashmir and other cities of India, Union Railway Minister’s big announcement

जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा उधमपूर-बनिहाल ट्रॅक या वर्षी डिसेंबरपर्यंत किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला पूर्ण होईल, असे मंत्री म्हणाले. त्यानंतर त्यावर ट्रेन धावतील. या ट्रेन्स देशाच्या विविध भागातून धावणार आहेत.



वंदे भारत एक्स्प्रेस या ट्रॅकवर धावणार

माहिती देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, उधमपूर-बनिहाल ट्रॅकसाठी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनदेखील विकसित केली जात आहे. या ट्रॅकवर लवकरच ही सेमी हायस्पीड ट्रेन धावणार आहे. अंदाजानुसार ती पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत सुरू होऊ शकते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नौगाम भागातील श्रीनगर रेल्वे स्थानकावर एका कार्यक्रमाला संबोधित करताना ही सर्व माहिती दिली आहे.

काश्मीरमधील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल

जम्मू आणि श्रीनगरला जोडणाऱ्या उधमपूर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पाहणी साठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पोहोचले होते. रेल्वेमंत्री म्हणाले की, चिनाबवरील रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. भूकंपापासून प्रत्येक परिस्थितीचा यावर अभ्यास करण्यात आला आहे. हा सर्व परिस्थितींसाठी योग्य आहे.

काश्मीरमधील भारतातील पहिल्या रेल्वे स्टेशनला भेट

ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर करत अश्विनी वैष्णव यांनी लिहिले की, त्यांनी काश्मीरमधील भारतातील पहिल्या रेल्वे स्टेशनलाही भेट दिली आणि स्टेशनवरील दुकानातून स्थानिक उत्पादने खरेदी केली.

Railway to start between Kashmir and other cities of India, Union Railway Minister’s big announcement

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात