रेल्वेला कोरोनाकाळात ३६ हजार कोटींचा अभुतपूर्व तोटा; रेल्वे राज्यमंत्री दानवेंची माहिती


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – रेल्वेला कोरोना प्रादुर्भावाच्या काळात तब्बल ३६ हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. Railway affects very badly due to corona

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. मागील वर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे रेल्वे गाड्याही प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या. या काळात फक्त रेल्वेची मालवाहतूक सुरू राहिली.



अद्यापही सर्व रेल्वे वाहतूक रुळावर आलेली नाही. दानवे म्हणाले रेल्वेची मालवाहतूक वास्तवात मोठा महसूल जमा करत आहे. प्रवासी रेल्वे प्रवाशांवर व रेल्वे तिकिटाच्या दरावर अवलंबून असल्याने ती तोट्यात असते. त्यामुळे कोरोना काळात रेल्वेला अधिक तोटा झाला. परंतु, मालवाहतूक अखंड सुरू राहिल्याने त्यातून मोठा महसूल मिळाला. कोरोना काळात मालवाहतूक करून रेल्वेने सामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.

दानवे म्हणाले की मुंबई- नागपूर एक्स्प्रेस वे सह एक बुलेट ट्रेनही कार्यान्वित केली जाईल, ज्याचे काम वर्तमानात सुरू आहे. तसेच रेल्वेकडून नवी मुंबई ते दिल्ली जोडणारा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर योजना तयार करण्यात आली आहे.

Railway affects very badly due to corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात