विशेष प्रतिनिधी
मुंबई – देशातील आयआयटी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली जेईई मेन (सत्र -४) ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत गुरुवारी २६ ऑगस्टपासून देशभरात घेतली जाणार आहे. यासाठीच्या नवीन तारखा एनटीए जाहीर केल्या आहेत.
जेईई मेनची ही परीक्षा पूर्णपणे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी https://Jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
त्यासाठी विद्यार्थ्यांना जन्मतारखेची नोंद आणि इतर काही माहिती भरून हे हॉल तिकीट घ्यायची आहेत. हॉलतिकीटसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास त्यासाठी हेल्प लाईन आणि ई-मेलची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देशभरातून सुमारे ९२ हजारांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत, तर जेईई-मेन ही मुख्य परीक्षा २६, २७ आणि ३१ ऑगस्टला आणि त्यानंतर एक आणि दोन सप्टेंबरला देश आणि विदेशातील विविध ३३४ शहरांतील परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App