पाकिस्तानात दोन रेल्वे समोरसमोर एकमेकांवर आदळल्या, अपघातात ५० प्रवासी ठार

वृत्तसंस्था

कराची : पाकिस्तानमध्ये दोन पॅसेंजर रेल्वेत झालेल्या भीषण अपघातात ५० हून अधिक ठार तर ७० हून अधिक जखमी झाले आहे. कराचीहून सरगोधाकडे जाणारी मिल्लत एक्स्प्रेस आणि रावळपिंडीहून कराचीला जाणारी सर सईद एक्स्प्रेस यांच्यात सकाळी ढरकी गावाजवळ जोरात टक्कर झाली. अपघातानंतर मिल्लत एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी आणि आरोग्य प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच घोटकी, ढरकी, ओबरो, मिरपूर माथेले येथील रुग्णालयात आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली. Rail accident in Pakistanया अपघातात किमान ५० जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांत महिला आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी रेल्वे अपघाताबद्धल शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवर त्यांनी रेल्वे आणि आरोग्य विभागास वैद्यकीय मदत पुरविण्यासंदर्भात वेगवान हालचाली करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेतील त्रुटी दूर करण्यासाठी चौकशी करण्याची सूचनाही दिली आहे.

Rail accident in Pakistan

महत्त्वाच्या बातम्या