
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 2024 चा लोकसभा निवडणुकांसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधकांची मोट बांधण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत असताना काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढाकार घेतला आहे. Rahul Gandhi’s initiative for unity of opposition in Parliament; But that is not all
त्यांनी आज सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सुमारे दीड तास बैठक घेऊन संसदेतले विरोधकांचे धोरण ठरविले. महागाई, पेगासस, कृषी कायदे, शेतकरी आंदोलन या प्रत्येक मुद्द्यावर सर्व विरोधकांची एकजूट आहे. विरोधकांना संसदेत या विषयांवर चर्चा करायची आहे. सरकारकडून आम्हाला उत्तरे हवी आहेत, असे राहुल गांधी यांनी विरोधी नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
या बैठकीला काँग्रेसचे राज्य भेटले नेते आणि विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले नेते अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, द्रमुकचे नेते टी आर बालू, शिवसेना खासदार संजय राऊत तसेच डाव्या पक्षांचे खासदार उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना पाठिंबा दर्शविला.
We don’t want to compromise on the issues of inflation, Pegasus, and farmers' issues. We want discussion in the House: Congress leader Rahul Gandhi to ANI after a meeting of Opposition leaders at Parliament
(File photo) https://t.co/bK7PJHITPO pic.twitter.com/9GZC7Z0Urd
— ANI (@ANI) July 28, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर संसद चालू न देण्याचा आरोप केला आहे. त्याला राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे संसदेत आम्हाला महागाई, पेगासस, कृषी कायदे, शेतकरी आंदोलन या विषयांवर चर्चा करायची आहे. सरकारने या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
मात्र, राहुल गांधी यांनी एवढे सांगूनही संसदेत विरोधकांची वर्तणूक बदललेली नाही. राज्य सभेत त्यांनी सुरुवातीपासूनच गोंधळ घालून आत्ताचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करायला लावले. विरोधी खासदारांच्या गटाने एकाच प्रकारच्या स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा दोन्ही सभागृहात दिल्या आहेत.
Rahul Gandhi’s initiative for unity of opposition in Parliament; But that is not all
महत्त्वाच्या बातम्या
- केरळ होतोय वेगाने म्हातारा, २० टक्केंहून अधिक जनता ज्येष्ठ नागरिक
- उर्जामंत्र्यांच्या डिबेटनंतर गोवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले, राजकीय फायद्यासाठी आमच्या महान नेत्यांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही
- जगन्नाथाची भूमी पूरीमध्ये युरोप, अमेरिकेइतकेच शुध्द पाणी, अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा
- आप पंजाबमध्ये स्वबळावरच लढणार, कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही
- बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन समर्थकाची आत्महत्या