देशात कोरोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आणखी चार लसींचे उत्पादन घेण्याचे नियोजन असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत २०० कोटी लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत.Rahul Gandhi’s drama has always been stopped by the people, Prakash Javadekar’s counterattack
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आणखी चार लसींचे उत्पादन घेण्याचे नियोजन असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत २०० कोटी लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत.
नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे वरिष्ठ सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रपरिषदेत याबाबतची माहिती दिली. देशात लसींचे उत्पादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. येत्या काही महिन्यांत देशात आणखी चार नव्या लसी उपलब्ध होणार आहेत.
त्यात ह्यबायो-ईह्ण, जायडसची डीएनएवर आधारित लस, भारत बायोटेकची नेजल आणि जीनेवाच्या लसींचा समावेश आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत देशात विविध लसींच्या 200 कोटी मात्रांचे उत्पादन झालेले असेल, असे त्यांनी सांगितले.
डॉ. पॉल म्हणाले की, कोविड सुरक्षा योजनेंतर्गत जायडस कॅडिला, बायो-ई आणि जीनेवाच्या लसींची देशातच निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेंतर्गत या कंपन्यांना तांत्रिक पाठबळ देण्यात येणार आहे.
भारत बायोटेकच्या नाकातून दिल्या जाणाºया एकल लसीसाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जात आहे. या सर्व लसी स्वदेशी असणार आहेत. भारतीय कंपन्यांनी स्पुटनिक व्ही लसीच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
डॉ. रेड्डीज लॅबच्या सहयोगाने इतर 6 कंपन्यांनी स्पुटनिकचे भारतात उत्पादन करण्याची तयारी देखील सुरू केली असून, लवकरच या लसींचे उत्पादन केले जाणार आहे, असेही पॉल यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App