गंगा नदीने बोलावण्याचा दावा करणाऱ्यांनी गंगामातेला रडवले, राहुल गांधीची मोदींवर टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : “गंगेने बोलावल्याचा दावा करणाऱ्यानेच गंगामातेला रडवले”, अशा शब्दांत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.Rahul Gandhi targets Modiji

गंगा नदीच्या ११४० किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर गेल्या काही दिवसात दोन हजारहून अधिक मृतदेह दफन करण्यात आल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान केले. “गंगेने बोलावले असे जो म्हणत होता त्यानेच गंगामातेला रडवले आहे”,असे खोचक ट्विट राहुल गांधींनी केले. गंगेच्या काठावरील गावांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी लाकडे नसल्यामुळे मृतदेहांचे दफन केले जात असल्याचे तसेच काहींनी तसेच मृतदेह नदीपात्रात सोडून दिल्याचेही आढळून आले आहे.

दुसरीकडे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गुजरातमधील मृतांच्या संख्येवरून सत्ताधारी भाजपवर आकडे दडविल्याचा आरोप केला.

गुजरातमध्ये एक मार्च ते १० मे दरम्यान १.२३ लाख मृत्यू दाखले वाटप झाले असताना राज्य सरकारने केवळ ४२१८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला.

Rahul Gandhi targets Modiji

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण