Rahul Gandhi first Rally in West Bengal, criticized BJP and Mamata Banerjee

प. बंगालमध्ये राहुल गांधींची पहिली सभा, भाजप-ममतांवर केली टीका, म्हणाले- नोकरीसाठी कट मनी द्यावे लागणारे बंगाल एकमेव राज्य

Rahul Gandhi : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. एकीकडे जोरदार प्रचार सुरू असतानाच, दुसरीकडे एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. काँग्रेसे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पहिल्यांदा प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर तसेच ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यात भाजपची सत्ता आली, तर राज्य उद्ध्वस्त होईल. Rahul Gandhi first Rally in West Bengal, criticized BJP and Mamata Banerjee


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. एकीकडे जोरदार प्रचार सुरू असतानाच, दुसरीकडे एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. काँग्रेसे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पहिल्यांदा प. बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर तसेच ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यात भाजपची सत्ता आली, तर राज्य उद्ध्वस्त होईल.

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, उत्तर दिनाजपूर मेळाव्यादरम्यान राहुल गांधी म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने द्वेष आणि हिंसेशिवाय काही दिले नाही. त्यांना पश्चिम बंगालचे विभाजन करून ते उद्ध्वस्त करायचे आहे, जसे ते आसाम आणि तामिळनाडूमध्ये करत आहेत.”

राहुल गांधी म्हणाले की, भाजप ‘सोनार बांग्ला’ बनवण्याविषयी बोलत आहे, परंतु यामुळे संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला आहे. राहुल यांनी ममतांवरही निशाणा साधत म्हटलं की, आम्ही कधीही भाजपाशी युती केली नाही, परंतु ममताजींनी हे (पूर्वी) केले आहे. पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे जिथे तुम्हाला नोकरी मिळविण्यासाठी ‘कट मनी’ द्यावा लागतो.

17 एप्रिलला 5व्या टप्प्यातील मतदान

पश्चिम बंगालमधील एकूण 294 जागांसाठी 8 टप्प्यांत मतदान होत आहे. आतापर्यंत मतदानाचे चार टप्पे संपले आहेत. बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिल रोजी होईल. 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

एकीकडे भाजप निवडणुकीच्या मैदानात आहे, तर दुसरीकडे टीएमसी आहे. फुरफुरा शरीफ यांच्या ऑल इंडिया सेक्युलर फ्रंटसोबत काँग्रेस आणि डाव्यांची आघाडी आहे. त्याचवेळी एआयएमआयएमने या निवडणुकीत उतरून निवडणूक अधिक रंजक केली आहे.

Rahul Gandhi first Rally in West Bengal, criticized BJP and Mamata Banerjee

महत्त्वाच्या बातम्या