Fact Check : मॉलबाहेर पोलिसाचा गोळीबार ,काय आहे व्हायरल व्हिडीओमागील सत्य ?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मॉलबाहेर पोलिसाने तरुण दाम्पत्यावर गोळी झाडल्याचा एक व्हिडीओ सोशल माडियावर व्हायरल झाला आहे. भरदिवसा ऐन गर्दीत घडलेल्या या प्रकारामुळे नेटिझन्स चक्रावले आहेत. मात्र संबंधित व्हिडीओ एका वेब सीरिजमधील सीन असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. Fact Check on Trending Viral Video of Couple Being Shot by Police Outside a Mall

काय आहे व्हिडीओमध्ये?

फ्रेण्ड्स कॅफेबाहेरील रस्त्यावर पोलिस अधिकारी आणि एका तरुणाची बाचाबाची होते. क्षणार्धात अधिकारी तरुणाला खाली ढकलतो आणि खिशातून बंदूक काढून त्याच्यावर गोळी झाडतो. त्यानंतर त्याला जाब विचारणाऱ्या सोबतच्या तरुणीचीही तो गोळी झाडून हत्या करतो, असं संबंधित वेब सीरिजमधील कथानक आहे. कोणीतरी चहाटळपणे त्यातील तितकाच व्हिडीओ कट करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे नेटिझन्समध्ये घबराट पसरली.

पोलिस अधीक्षकांकडून खुलासा

‘#FactCheck- पोलिसाने एका रेस्टॉरंटबाहेर केलेल्या हत्येचा व्हिडीओ सकाळपासून सोशल मीडियावर पसरला आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण होऊन गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. याबद्दल तपास केला असता हरियाणीतल कर्नालमधील हा व्हिडीओ असल्याचं समजलं. फ्रेण्ड्स कॅफेच्या मॅनेजरच्या माहितीनुसार हा एका वेब सीरिजसाठी केलेल्या चित्रिकरणाचा भाग असल्याचं स्पष्ट झालं.’ असं ट्विट उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी व्हिडीओ शेअर करत केलं आहे.

हरियाणीतल कर्नालमध्ये एका मॉलबाहेर या वेब सीरीजचे शूटिंग करण्यात आले.

पोलिसांच्या प्रतीमा मलीन करणाऱ्या वेब सीरीज बॅन कराव्यात, अशी मागणी काही जणांनी राहुल श्रीवास्तव यांच्या ट्वीटवर केली आहे.

Fact Check on Trending Viral Video of Couple Being Shot by Police Outside a Mall

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण