RAFALE DEAL: राहूल गांधी म्हणतात पग-पग पर सत्य : संबित पात्रा म्हणाले  उलटा चोर कोतवालको डाटे!भाजप-कॉंग्रेस आमने-सामने


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : राफेल प्रकरणामध्ये फ्रेंच मॅगझिन मीडिया पार्टने नुकताच खळबळजनक बातमी पुढे आणली आहे. या बातमीनुसार फ्रेंच विमाने निर्माण करणारी कंपनी डिसॉल्ट एव्हिएशनने भारताकडून करार सुरक्षित करण्यासाठी एका मध्यस्थी व्यक्तीला गुप्तपणे सुमारे 65 कोटी रुपये दिले. डीसॉल्ट कंपनीला लाचेची दिलेली रक्कम सक्षम करण्यासाठी बनावट बिले देखील देण्यात आली होती. मीडियापार्टच्या वृत्तानुसार हा व्यवहार 2007 ते 2012 या दरम्यान मॉरिशसमधील एका मध्यस्थी व्यक्तीद्वारे करण्यात आला होता.

RAFALE DEAL: BJP-Congress face to face again

2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी कॉंग्रेसने या करारावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावत, या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगितले होते. 2019 मध्येच सुप्रीम कोर्टाने या कराराची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका देखील फेटाळल्या होत्या. कारण त्याला कोणताही आधार नाही असे सांगण्यात आले होते.

फ्रेंच मॅगझीन मिडीयापार्ट नुसार, सर्व कागदपत्रे असूनही भारतीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाला पुढे न जाण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये ऑफशोर कंपन्या, संशयास्पद करार आणि बनावट बिलांचा समावेश आहे असा दावा करण्यात आला आहे. भारतीय तपास संस्था सीबीआय, ईडी यांच्या अधिकार्यांकडे ऑक्टोबर 2018 पासून पुरावे आहेत की, फ्रेंच एअरलाइन डीसॉल्ट कंपनीने मध्यस्थ सुशेन गुप्ता याला गुप्तपणे 65 कोटी रुपये दिले होते. तरीही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. असा आरोप मिडीयापार्ट या मॅगझिनने केला आहे.


WATCH | शत्रूच्या छातीत धडकी भरवणारी आणखी 3 राफेल विमानं हवाई दलात दाखल


या प्रकरणावर उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणतात की, राहुल गांधी सध्या भारतात नाहीयेत. हे प्रकरण जेव्हा झाले तेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होते. राहुल गांधींनी इटलीमधून या प्रश्नावर उत्तर द्यावे. कॉंग्रेसने या सर्व गोष्टींमध्ये संभ्रम पसरवण्याचे आतापर्यंत काम केले आहे. भारतीय हवाई दलाला लढाऊ विमानांची कोणतीही गरज नसताना 10 वर्ष हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता. ते तडजोड का करत होते? हे अत्यंत खेददायक आहे.

पात्रा पुढे म्हणतात की, ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असे झाले आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस ‘आय नीड कमिशन’ असे म्हणते. आणि ही अतिशयोक्ती होणार नाही की कमिशनशिवाय त्यांचे कोणतेही काम होत नाही. युपीएच्या काळात त्यांची प्रत्येक डीलमध्ये एक डील असायची. असा आरोप पात्रा यांनी केला आहे.

यावर काँग्रेसचे राहुल गांधी म्हणतात, जेव्हा प्रत्येक टप्प्यावर सत्य तुमच्यासोबत असते, तेव्हा काळजी करण्याची काय गरज असते? माझ्या सर्व काँग्रेस सहकार्यांनो केंद्र सरकारच्या विरोधात असेच लढत राहू. थांबू नक. खचू नका. घाबरू नका. असे त्यांनी आपल्या ट्विटरद्वारे सर्व काँग्रेस नेत्यांना संदेश दिला आहे.

RAFALE DEAL: BJP-Congress face to face again

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात