विज्ञानाची गुपिते : मंगळावर ऑक्सीजनचे प्रमाण नेमके किती ?


मंगळावर पाणी सापडलं म्हणजे आता मनुष्य वस्ती होईल का? तिकडे एक नवीन जीवन सुरु होईल का? हे पाणी शोधलं कसं? असे अनेक प्रश्न सरबत्ती सामान्य माणसाच्या मनात नेहमी येतात. पाणी म्हणजे जीवन हे मंगळावर खरं होईल का? ह्यासाठी आपल्याला वरच्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण गरजेचं ठरते.What exactly is the amount of oxygen on Mars?

मंगळ हा ग्रह सूर्यापासून २२७.९ मिलियन किलोमीटर अंतरावर आहे. आपली पृथ्वी साधारण १४९.६ मिलियन किलोमीटर अंतरावर आहे. ह्यामुळे मंगळावर सूर्याची उष्णता कमी पोहचते. अवकाशात पृथ्वी निळ्या रंगाची दिसते हा रंग पृथ्वीला मिळतो तो पाण्यामुळे. त्याचवेळेस मंगळ तांबूस दिसतो तो त्यावर असलेल्या माती, खडकांच्या शुष्क रंगामुळे. पृथ्वी वर साधारण २१ टक्के ऑक्सिजन आहे तर त्याचवेळेस मंगळवार साधारण ०.१३ टक्के ऑक्सिजन आहे. मंगळावर ९५.३ टक्के कार्बन डायऑक्साईड आहे.

जे घटक कोणत्याही सजीव सृष्टीसाठी लागतात ते मंगळावर असले तरी त्यांचं प्रमाण पृथ्वी आणि मंगळात खूप फरक आणते. मंगळवार विरळ वातावरणामुळे तापमान खूप कमी असून शुन्याच्या खाली साधारण उणे -९० डिग्री सेंटीग्रेड पर्यंत सरासरी असते. त्याचवेळी मंगळाच्या वातावरणात पाणी हे प्रवाही स्वरूपात नसून बर्फाच्या स्वरूपात असते. जर कोणतीही सजीव वस्तू इकडे तग धरून रहायची असेल तर आधी मंगळाचं वातावरण घट्ट करता यायला हवं म्हणजे त्यात अजून खूप मोठ्या प्रमाणात ग्रीन हाउस गॅसेस मिसळायला हवेत.

त्यामुळे पूर्ण ग्रहाचं तपमान वाढण्यास मदत होईल. ग्रीन हाउस गॅसेस ग्रहाच्या पृष्ठभागापासून परावर्तीत होणाऱ्या उष्णतेला रोखून धरतात त्यामुळे एकूणच ग्रहाचं तापमान वाढते. पृथ्वीवर आपण सध्या जी ओरड चालू आहे ग्लोबल वार्मिंग ची तो हाच प्रकार आहे. सतत ह्या वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वी गरम होते आहे. त्याचे परिणाम आपण बघत आहोत. त्यामुळे सध्या तरी मंगळावर जीवसृष्टी साकराली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण तेथे असलेले ऑक्सीजनच अगदी कमी प्रमाण. शेवटी जीवसृष्टीसाठी क्सीजन हाच फार महत्वाचा घटक आहे, त्याबरोबर पाणी. पण त्याचे प्रमाणही पुरसे असणे गरजेचे आहे.

What exactly is the amount of oxygen on Mars?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात