आदित्यनाथ यांनी भेट दिलेल्या ठिकाणाचे सप कार्यकर्त्यांकडून गंगाजलाद्वारे शुद्धिकरण


विशेष प्रतिनिधी

लखनौ – उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेली ठिकाणांचे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गंगाजल वापरून शुद्धिकरण केले. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.Purification of the place visited by Adityanath by Gang activists through Gangajla

समाजवादी पक्षाच्या युवजन सभेचे प्रदेशाध्यक्ष भावेश यादव यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून यादव यांना पोलिसांनी अटक केली.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते मंगळवारी संबळ जिल्ह्यातील कालिया देवी येथे २७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. आदित्यनाथ यांनी यावेळी सभेलाही संबोधित केले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी समाजवादी पक्षाच्या युवजन सभा या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळाचे तसेच हेलिपॅडचेही गंगाजल शिंपडून शुद्धिकरण केले

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी येथील कालिया देवी मंदिराला भेट न देऊन देवीचा अपमान केल्याचा आरोप भावेश यादव यांनी केला. मात्र, सप कार्यकर्त्यांच्या या कृतीविरुद्ध संबळमधील एका रहिवाशाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Purification of the place visited by Adityanath by Gang activists through Gangajla

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”