Punjab Election Congress announces 86 candidates, Chief Minister Channi Chamkaur Sahib, Sidhu to contest from Amritsar East

Punjab Election : काँग्रेसने ८६ उमेदवारांची घोषणा, मुख्यमंत्री चन्नी चमकौर साहिब, तर सिद्धू अमृतसर पूर्वमधून लढणार

Punjab Election : पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज सत्ताधारी काँग्रेसने आपल्या 86 उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी चमकौर साहिबमधून, तर नवज्योतसिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवणार आहेत. अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद मोगामधून निवडणूक लढवणार आहे. प्रताप सिंग बाजवा कादियानमधून, तर गायक सिद्धू मुसेवाला मानसामधून निवडणूक लढवणार आहेत. Punjab Election Congress announces 86 candidates, Chief Minister Channi Chamkaur Sahib, Sidhu to contest from Amritsar East


वृत्तसंस्था

चंदिगड : पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज सत्ताधारी काँग्रेसने आपल्या 86 उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी चमकौर साहिबमधून, तर नवज्योतसिंग सिद्धू अमृतसर पूर्वमधून निवडणूक लढवणार आहेत. अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद मोगामधून निवडणूक लढवणार आहे. प्रताप सिंग बाजवा कादियानमधून, तर गायक सिद्धू मुसेवाला मानसामधून निवडणूक लढवणार आहेत. कादियानमधून प्रतापसिंग बाजवा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पठाणकोटमधून अमित विज आणि दीनानगरमधून अरुणा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बलबीर सिद्धू मोहालीतून मैदानात उतरणार आहेत, तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय कॅप्टन संदीप संधू यांना डखा येथून तिकीट देण्यात आले आहे. मलोतचे आमदार आणि विधानसभेचे उपसभापती अजयबसिंग भाटी यांचे नाव कापण्यात आले आहे. येथून आम आदमी पार्टी सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या रुपिंदर कौर रुबी यांना तिकीट देण्यात आले आहे.

सुनील जाखड यांचे पुतणे संदीप जाखड यांना अबोहरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. फिरोजपूरमधून परमिंदर पिंकी आणि झिरामधून कुलबीर जीरा यांना तिकीट देण्यात आले आहे. नाभामधून साधूसिंग धरमसोत, सुजानपूरमधून नरेश पुरी, गुरदासपूरमधून बरिंदरजीत सिंग फरा, श्री हरगोबिंदपूरमधून मनदीप सिंग, फतेहगढ चुडियातून तृप्त राजिंदर सिंग बाजवा आणि डेरा बाबा नानकमधून सुखजिंदर सिंग रंधावा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अजनाळामधून हरप्रताप सिंग अजनाला, राजासांसीमधून सुखविंदर सिंग सरकारिया, मजिठामधून जगविंदर पाल सिंग यांना तिकीट देण्यात आले आहे. जंदियालामधून सुखविंदर सिंग दैनी, अमृतसर उत्तरमधून सुनील दत्ती, अमृतसर पश्चिममधून राजकुमार वेरका, अमृतसर सेंट्रलमधून ओमप्रकाश सोनी, अमृतसर दक्षिणमधून इंदरबीर सिंग बुलारिया, तरनतारनमधून डॉ. धरमबीर अग्निहोत्री आणि पट्टीतून हरमिंदर सिंग गिल यांना तिकीट देण्यात आले आहे. बाबा बकाला येथून संतोख सिंग, भुलथमधून सुखपाल खैरा, कपूरथला येथून राणा गुरजीत सिंग, सुलतानपूर लोधीमधून नवतेज चीमा, फगवाडा येथून बलविंदर सिंग धालीवाल, फिल्लौरमधून विक्रमजीत चौधरी, शाहकोटमधून हरदेव सिंग, करतारपूरमधून चौधरी सुरिंदर सिंग आणि पश्चिम जालंधरमधून सुशील कुमार यांचा समावेश आहे. रिंकूला तिकीट देण्यात आले आहे.

तत्पूर्वी, दिल्लीत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तिकिटांची पहिली यादी अंतिम करण्यासाठी विचारमंथन सुरू होते, यादरम्यान पाच नावांवर एकमत होऊ शकले नाही. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत विचारमंथन झाले. पंजाबमधील सर्व दिग्गज नेत्यांनी आपली बाजू सोनिया गांधींसमोर मांडली आहे. 20 जागांवर आपल्या समर्थकांचे समायोजन करण्याच्या बाबत सिद्धू आणि चन्नी यांनी आपला विरोध व्यक्त केला.

Punjab Election Congress announces 86 candidates, Chief Minister Channi Chamkaur Sahib, Sidhu to contest from Amritsar East

महत्त्वाच्या बातम्या