विशेष प्रतिनिधी
बंगलोर : कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आपल्या मरणानंतर त्यांनी आपले डोळे दान करण्याचे ठरवले होते. 1994 साली त्यांच्या वडिलांनी घरातील सर्व लोकांचे डोळे त्यांच्या मरणानंतर दान केले जातील अशी प्रतिज्ञा केली होती.
Puneet Rajkumar’s two eyes gave sight to four people
पुनीत राजकुमार यांच्या मरणानंतर त्यांचे डोळे शुक्रवारी कलेक्ट करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच ते ट्रान्सप्लांट करण्यात आले आहेत. ही शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर शेट्टी म्हणाले, नेहमी आम्ही दोन डोळे दान केल्यानंतर दोन लोकांना दृष्टी देऊ शकतो पण पुण्याच्या केसमध्ये चार तरुणांना याचा फायदा झाला आहे.
प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
आता तुम्ही म्हणाल की दोन डोळ्याने चार लोकांना दृष्टी कशी देण्यात आली?
डॉक्टर शेट्टी नवीन टेक्नॉलॉजी बद्दल सांगतात, कॉर्नियाचा वरचा आणि खालचा थर एकमेकांपासून वेगळे केल्यानंतर एकावेळी दोन रुग्णांवर उपचार करण्यास मदत होते. ज्या लोकांना सुपरफिशिअल कॉरनिअल डिसिज असतो त्यांना सुपेरियर लेयर ट्रान्सप्लान्ट करून दृष्टी देता येते. तर ज्या लोकांना डीप कॉर्नियल लेयरचा रोग आहे, त्या लोकांना डोळ्यातील डीप लेयर ट्रान्सप्लांट करून दृष्टी देता येते. अशा प्रकारे पुनितच्या डोळ्यांनी चार लोकांना दृष्टी देण्यास मदत केली आहे.
सुपरस्टार पुनित यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App