अजित पवार, अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची शालिनीताई पाटलांची राज्यपालांकडे मागणी


प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कवडीमोल भावाने गिळंकृत केला आहे. यामुळे अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.Shalinitai Patil demands removal of Ajit Pawar, Ashok Chavan from Cabinet

शालिनीताई पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी जरंडेश्वर साखर कारखानाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा दुरूपयोग करून कारखान्याचा बेकायदेशीर लिलावात विकत घेऊन ऊस उत्पादक सभासदांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.


अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदमांच्या घरांवर ईडीचे छापे


डॉ. शालिनीताई पाटील यांनी राज्यपालांना निवेदन दिले आहे. मंत्रीपदाचा आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजित पवार आणि अशोक चव्हाण यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने घेतले. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. हजारो शेतकरी सभासदांची त्यांनी फसवणूक केली आहे. अजित पवार यांनी सत्तेचा दुरुपयोग करून जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना कमी किमतीत बेकायदेशीर लिलावात विकत घेऊन कोरेगाव-खटाव तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने अजित पवार यांची फसवणूक उघडकीस आणली आणि साखर कारखान्याच्या विद्यमान खासगी संचालकांवर गुन्हे दाखल केले. आता कायदेशीर कारवाई करून ईडीने साखर कारखाना जप्त केला आहे. कमी किमतीत सहकारी साखर कारखाने गिळंकृत करणाऱ्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची शिफारस राज्यपालांनी राज्य शासनाकडे करावी, अशी मागणी शालिनीताई पाटील यांनी राज्यपालांकडे केली.

यावेळी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीरंग सापते, संचालक पोपटराव जगदाळे, कार्यकारी संचालक किसनराव घाडगे, संचालक अक्षय बर्गे, काकासाहेब कदम, शंकर मदने आदी उपस्थित होते.

Shalinitai Patil demands removal of Ajit Pawar, Ashok Chavan from Cabinet

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात