अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदमांच्या घरांवर ईडीचे छापे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीने पुन्हा छापेमारी केली आहे. अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे अधिकारी झाडाझडती घेत आहेत. कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाने छापा घातला आहे. जगदीश सध्या दौंड शुगरचे संचालक आहेत. दौंड शुगर्स, जरंडेश्वर साखर कारखाना यांदर्भात ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ED raids Ajit Pawar’s cousin Jagdish Kadam’s house

वृत्तसंस्था एएनआयने देखील या छाप्यांची बातमी दिली असून महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर मुंबई आणि पुण्यात छापे घालण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.

जगदीश कदम हे दौंड शुगर या कारखान्याचे संचालक आहेत. यासंदर्भात इडीकडून तपास करण्यात येत आहे. ईडीने दौंड शुगर संबधित लोकांची याआधी ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जगदीश कदम यांची चौकशी करण्यात येत आहे.

अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्यांवरील कारवाईमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याआधी बारामती काटेवाडी, सातारा, कोल्हापूरमध्ये अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी प्राप्तिकर विभागाने छापे घातले होते.

आलेगाव दौंड येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्यात प्राप्तिकर विभागाने सात ऑक्टोबर रोजी सकाळी शोध मोहीम सुरू केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मोहिमेंतर्गत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) चे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते. त्यावेळी जगदीश कदम यांची प्राप्तिकर विभागाने पुणे येथे चौकशी केली होती. तर वीरधवल जगदाळे यांच्याकडे कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत कारखान्याचे व्यवहार आणि करविषयक चौकशी केली होती.

ED raids Ajit Pawar’s cousin Jagdish Kadam’s house

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती