Puducherry Election Results : पुडूचेरीत भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत , १६ जागा जिंकल्या ; काँग्रेस आघाडी ८ तर इतर पक्ष ६ जागावर विजयी

विशेष प्रतिनिधी

पुडूचेरी : केंद्र शासित प्रदेश पुडूचेरी येथील विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून सर्व निकाल हाती आले आहेत. भाजपप्रणित आघाडीने 30 पैकी 16 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. Puducherry Election Results

पुडुचेरी येथे एकूण विधानसभेच्या एकूण 33 जागा असून त्यापैकी 3 सदस्य नामनिर्देशित आहेत. अशा प्रकारे केवळ 30 जागांवर 6 एप्रिलला एका टप्प्यात मतदान झाले होते.माजी मुख्यमंत्री रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणित आघाडीने 16 जागा जिंकल्या आहे. काँग्रेसप्रणित आघाडीने 8 जागा जिंकल्या आहेत. इतर पक्षानी 6 जागा जिंकल्या आहेत. कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाला खातेही उघडता आले नाही.

Puducherry Election Results

महत्त्वाच्या बातम्या