पब्लिक मोलेस्टेशन : बंगलोर मध्ये ओला कॅब ड्रायव्हरने तरुण मुली समोर केले मास्टरबेशन


विशेष प्रतिनिधी

बेंगलोर : बंगलोरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक तरूण पत्रकार ऑफिस संपल्यानंतर जेव्हा आपल्या घरी जात होती तेव्हा ओला कॅब ड्रायव्हरने तिच्यासमोर मास्टरबेट केले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. ती मुलगी पत्रकार आहे त्यामुळे तिने लगेचच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या घटनेची माहिती दिली.

Public Molestation: Ola cab driver masturbates in front of young girl in Bangalore

ती आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, बंगलोर हे माझे घर आहे. आणि मी आयुष्यात सर्वात प्रथम आपल्याच घरामध्ये अतिशय असुरक्षिततेचा अनुभव घेतला. हा अतिशय वाईट अनुभव होता. आपण जेव्हा कामावरून घरी जात असतो तेव्हा असं काही आपल्याला पाहायला, अनुभवायला मिळेल अशी अपेक्षा नसते. पण ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी अचानक काय कारायचे हे मला सुचले नाही. मला फक्त त्या कॅब मधून लवकरात लवकर बाहेर पडायचे होते म्हणून मी ओरडले. त्याच्यामुळे त्या व्यक्तीने गाडी थांबवली. नेमकं त्यावेळी गाडी सामसूम रस्त्यावर होती. तरी मी गाडीतून उतरले आणि तो गाडी घेऊन निघून गेला. त्यानंतर दुसरी गाडी घेऊन मी घरी आले.परंतु हा विषय इथेच संपत नाही.


कास्टिंग काऊच : सेक्शुअल फेव्हरसची मागणी केल्याबद्दल नवोदित अभिनेत्रीने पोलिसांमध्ये दाखल केली तक्रार


ती पुढे म्हणते की, कितीतरी मुली आहेत ज्या अशा प्रवासामध्ये असुरक्षिततेचा अनुभव घेत प्रवास करतात. म्हणूनच त्या जेव्हा गाडीमध्ये बसतात तेव्हा फोन करुन फोनवर बोलत असतात. त्याचप्रमाणे ओला कॅब किंवा रिक्षा बुक केली की आपले लोकेशन ते इतरांसोबत शेअर करतात. हे सर्व का करावं लागतं? कारण त्यांना आजही असुरक्षिततेची भावना सतावत राहते. म्हणूनच आज मला माझ्या शहरानेच हरवले आहे. पब्लिक मोलेस्टेशन ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे.

पोलीस कमिशनर कमल पंत यांनी तिच्या या पोस्टवर लगेच रिप्लाय केला आहे आणि तातडीने कारवाई केली जाईल अशी हमी देखील दिलेली आहे. तर ओला कंपनीकडून या सदर व्यक्तीला कामावरून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आज ह्या मुलीने सोशल मिडीयाचा वापर करुन तिच्यावर झालेल्या अन्य जगासमोर आणला. पण अशा बऱ्याच मुली आहेत ज्या आजही आपल्यावर झालेल्या अन्यायाला आवाज देण्यासाठी घाबरतात. पब्लिक मोलेस्टेशनच्या बऱ्याच केसेस होतात. पण कुणीही ह्या बद्दल बोलत नाही.

Public Molestation: Ola cab driver masturbates in front of young girl in Bangalore

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण