विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आता, पबजी गेमच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. हा गेम भारतात नव्या अवतारात परतणार असून आता या गेमचे नाव ‘बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया’ असेल. गुगल प्ले स्टोअरमध्ये या गेमचे ॲपही उपलब्ध झाले आहे. त्यावर युजरना पूर्वनोंदणी करता येईल.Pubji game will come in new format very soon
‘पबजी’ पुन्हा लाँच होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पबजी स्टुडिओने भारतात ‘टेन्सेट’ या कंपनीबरोरचा करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली. आता, नव्या गेमसाठी भारतातील मायक्रोसॉफ्ट अजुर डाटा सेंटरशी करार केला जाईल.
भारत सरकारने स्मार्टफोन युजरमध्ये अल्पकालावधीत लोकप्रिय झालेल्या पबजी गेमवर सप्टेंबर २०२० मध्ये बंदी घातली होती. या नव्या गेममध्ये काही बदल केले असून त्यात ग्रीन ब्लड आणि नवीन खाते प्रणालीचा समावेश आहे. ,
असे वृत्त ‘टेक क्रंच’ या अमेरिकी ऑनलाइन वृत्तपत्राने दिले आहे. मात्र, हा नवीन गेम केवळ भारतातच उपलब्ध असेल, असे पबजी व हा गेम बनविणाऱ्या क्राफ्टन या व्हिडिओ गेम कंपनीने स्पष्ट केले. चीनमध्येही कंपनीने याप्रमाणेच ‘गेम फॉर पीस’ उपलब्ध करून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App