आपल्या इच्छेप्रमाणे इंद्रियांच्या खिडक्या उघडा


तुम्ही जागृत आहात, त्या प्रमाणात अवतीभोवतीच्या साऱ्या गोष्टींकडून तुम्हाला ज्ञान मिळते. तुम्ही जागृत नसाल तर अतिशय अमूल्य ज्ञानसुद्धा तुम्हाला अर्थहीन वाटते. प्रवचनाच्या स्थळी अचानक बाहेरून खूप आवाज येऊ लागला आणि श्रोत्यातील एकजण खिडकी बंद करायला गेला. तुमच्या खिडकी उघडी व बंद करण्याच्या क्षमतेवर जागृती अवलंबून असते. बाहेर वादळ, पाऊस असतो, तेव्हा तुम्हाला खिडकी बंद करावी लागते, नाहीतर तुम्ही ओलेचिंब व्हाल. आत उकाडा असेल आणि गुदमरल्यासारखे होते, तेव्हा तुम्हाला खिडकी उघडावी लागते. तुमची इंद्रिये खिडक्यांप्रमाणे आहेत. All ways open the doors of mind and body

तुम्ही सजग असता तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या खिडक्या उघडू आणि बंद करू शकता. सजगतेत तुम्ही स्वतंत्र असता. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या खिडक्या बंद अथवा उघडू शकत नसाल तर तुम्ही जगात गुंतलेले आहात. याकडे लक्ष देणे म्हणजेच साधना किंवा अध्यात्मिक अभ्यास होय. भिन्न देवता आपल्या शरीराच्या निरनिराळ्या भागांचे संचालन करतात. सूर्याचा प्रभाव ज्या मज्जातंतूंवर पडतो, त्याला सूर्यचक्र म्हणतात. सूर्यचक्रावर सूर्याची पहिली किरणे पडणे शरीराला लाभदायक असते. म्हणूनच प्रातःकाळी सूर्यनमस्कार घालणे खूप चांगले असते. केंद्रीय स्नायू-संस्थेवर, डोळ्यांच्या तंतुवर आणि पोटावर सूर्यचक्राचा खूप प्रभाव असतो. भविष्यातील घटनांसंबंधी सावधान करण्याची अनुभूतीही सूर्यचक्राच्या प्रभावाखाली असते. सूर्यचक्राला तुमच्या शरीराचे दुसरे मस्तकही म्हटले जाते. साधारणपणे सूर्यचक्र एखाद्या बदामापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे असते. योगासने, ध्यान आणि सुदर्शन क्रियेच्या नित्य अभ्यासामुळे ते एखाद्या माणसाच्या हाताएवढे बनू शकते. मग त्याची कार्यक्षमता अधिक प्रभावी होते. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या कार्यामध्ये समतोल साधला जातो. सूर्यचक्र संकुचित असल्यावर दुःख आणि उदासीनता येते.

नकारात्मक विचारांनी मन भरून जाते. सूर्यचक्र विस्तृत झाल्यावर अध्यात्मिक चेतना जागी होते, मन स्वच्छ आणि एकाग्र होते. तुम्हाला ध्यान करता येत नसेल, मन सैरभैर होत असेल, काहीच जमत नसेल तर असे समजा की तुम्ही थोडे मूर्ख आहात. मग तुम्ही खोलवर शिरू शकाल. तुमची बुद्धी ही तुमच्या सतसद्विवेकाचा एक छोटा भाग आहे. बुद्धीतच गुंतून पडलात तर तुम्ही बरेचसे गमवाल. तुम्ही बुद्धीपलिकडे जाल तेव्हा समाधान पावाल. तुम्ही मूर्ख बनता किंवा आश्चर्यचकित होता तेव्हा तुम्ही बुद्धीमत्तेच्या पलीकडे जाता.

All ways open the doors of mind and body

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात