महिलांना दिलेले आश्वासन तालीबान्यांनी मोडले, महिला न्यूज अ‍ॅँकरवर घातली बंदी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांनी तालिबानने आपल्या पहिल्या परिषदेत सांगितले की, अफगाण महिलांना स्वातंत्र्य दिले जाईल. महिलांच्या हक्कांचा आदर करण्याचे वचन देत ‘इस्लामिक कायद्यां’नुसार त्या काम करू शकतील असे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन मोडले आहे. तालिबानने महिला न्यूज अँकरवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक महिला पत्रकार बेरोजगार झाल्या आहेत.Promises made to women were broken by Taliban, ban on women’s news anchor

तालिबानने एका सरकारी वृत्तवाहिनीवरील सर्व अ‍ॅँकरला काढून टाकले आहे. आता तालीबानी दहशतवादीच अ‍ॅँकर झाले असून बातम्या सांगणार आहेत.नोकरीवरून काढून टाकल्यानंतर अँकर खादीजा अमीना म्हणाल्या, ‘मी काय करू, पुढच्या पिढीला काही काम राहणार नाही. 20 वर्षांत जे काही साध्य झाले होते ते नाहीसे होईल. तालिबानी आहेत तसेच आहेत, ते बदलले नाहीत.



कालच तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, आता अफगाणिस्तान मुक्त झाला आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये महिलांवर अनेक कडक निर्बंध लादण्यात आले होते. पण यावेळी महिलांशी कोणताही भेदभाव केला जाणार नाही. इस्लामिक कायद्याच्या निकषांनुसार महिलांना अधिकार दिले जातील.

महिलांना आरोग्य क्षेत्र आणि इतर क्षेत्रात काम करण्याचे स्वातंत्र्य असेल.1996 पासून 2001 पर्यंत अफगाणिस्तानच्या तालिबानच्या राजवटीत महिलांच्या हक्कांवर कठोरपणे निर्बंध घालण्यात आले होते. त्यांच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली होती. त्यांना घरातच राहणे भाग पाडले होते. कोणी पुरुष असल्याशिवाय घराबाहेर पडल्यास शिक्षा केली जात होती. चेहरा उघडा दिसला तर अत्यंत कडक शिक्षा दिली जात होती.

मानवाधिकार संघटना आणि संयुक्त राष्ट्रांनी तालिबानी अधिकाºयांनी महिला पत्रकारांसह महिला आणि मुलींच्या हक्कांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केल्याची तक्रार केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटनियो गुटेरेस म्हणाले की, अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींवरील वाढत्या मानवाधिकार उल्लंघनांमुळे ते चिंतित आहेत.

Promises made to women were broken by Taliban, ban on women’s news anchor

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात