हिंदूत्ववाद्यांनी द्वेष आणि हिंसा पसरवली, राहूल गांधी यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंदूत्ववाद्यांनी नेहमीच द्वेष आणि हिंसा पसरवली आहे आणि त्याची किंमत सर्व समुदायांना चुकवावी लागली आहे, असा आरोप कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी केला आहे. हरिद्वारमधील धर्मसंसदेचा संदर्भ देत भारत हिंसेच्याव विरोधात आहे आणि असं परत व्हायला नको, असे त्यांनी म्हटले आहे.Pro-Hindu activists spread hatred and violence, Rahul Gandhi alleges

राहूल गांधी यांनी हरिद्वारमध्ये 17 ते 20 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या ‘धर्म संसदेतील’ हेट स्पीचवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले ैआहे की, हिंदुत्ववादी नेहमी द्वेषाचा प्रसार करतात त्याची मोठी किंमत हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिस्ती लोकांना चुकवावी लागते.



अल्पसंख्याकांविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी वादात सापडलेल्या हरिद्वार येथे झालेल्या धर्म संसदेतील वक्त्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा फास आवळल्या जाऊ लागला आहे. जितेंद्र नारायण त्यागी आणि अन्य वक्त्यांविरोधात पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी याच महिन्यामध्ये मुस्लिम धमार्चा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला होता. या संसदेत सहभागी झालेल्या अन्य वक्त्यांनीही प्रक्षोभक वक्तव्ये केली होती,

त्यांच्या भाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ निर्माण झाली होती. या सर्वांविरोधात हरिद्वार कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Pro-Hindu activists spread hatred and violence, Rahul Gandhi alleges

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात