उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निमित्ताने सीएए विरोधी आंदोलनाला पुन्हा हवा देण्याचा प्रियंंका गांधी यांचा डाव


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : नागरिकत्व संशोधन विधेयक(सीएए) विरोधी आंदोलनाला उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हवा देण्याचा डाव कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी आखला आहे. त्यामुळे या आंदोलनात पोलीसांच्या गोळीबारात मरण पावलेल्या सुलेमान याच्या आईला कॉँग्रेसने बिजनौरमध्ये उमेदवारी दिली आहे.Priyanka Gandhi’s move to revive anti-CAA agitation on the occasion of Uttar Pradesh elections

बिजनौर येथे सीएए विरोधी आंदोलनात सुलेमान या २० वर्षीय तरुणाचा पोलीसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. प्रियंका गांधी यांनी सुलेमानच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्याची आई अकबरी खातून यांना बिजनौरमधून निवडणूक लढविण्यासाठी तयार केले. माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मी ही निवडणूक लढत आहे.त्याच्यासारख्या अनेकांनावर या सरकारने अत्याचार केले आहेत, असे म्हणत अकबरी खातून सांगताता. सीएए विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या 22 लोकांमध्य अकबरी खातून यांचा 20 वर्षांचा मुलगा मोहम्मद सुलेमान होता.

गृहिणी आणि सात मुलांची आई असलेल्या खातून म्हणतात की मुलाला न्याय मिळवून देण्यासाठीच प्रियंका गांधी यांनी तिकीटासाठी दिलेली आॅफर स्वीकारली. काँग्रेसने बुधवारी त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि खातून यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. सुलेमानच्या हत्येनंतर प्रियंका गांधी यांनी सुलेमानच्या कुटुंबाची भेट घेतली होती.

सुलेमान हा त्यावेळी पदवीच्या शेवटच्या वर्षात होता. नोएडामध्ये राहून यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. त्याला ताप असल्याने तो बिजनौर जिल्ह्यातील नेहतौर येथे घरी आला होता. यावेळी निदर्शनांवर झालेल्या पोलीसांच्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला.

मात्र, बिजनौर पोलीसांच्या विशेष तपास पथकाने म्हटले आहे की सुलेमान याचा हिंसाचारात सक्रीय सहभाग होता. त्यामुळेच पोलीस कॉन्स्टेबल मोहित कुमार याने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. स्वसंरक्षणासाठीच मोहित कुमार यांनी गोळी चालविली होती.

धर्म आणि जातीच्या आधारावर समाज विभागला जाऊ नय अशी आपली इच्छा असल्याचे खातून यांनी म्हटले असले तरी बिजनौरमधील मुस्लिम मतांच्या भरवशावरच त्या निवडणुकीला उभ्या आहेत. बिजनौर विधानसभा मतदारसंघात सुमारे 1.5 लाख मुस्लिम, 62,000 जाट, 95,000 अनुसूचित जाती आणि 20,000 सैनी आहेत.

समाजवादी पक्षाने जाट उमेदवार डॉक्टर नीरज चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे वडील तेजपाल सिंह बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर मतदारसंघातून दोन वेळा आमदार होते. भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार सुची चौधरी आहेत. बहुजन समाज पक्षाने बनिया जातीचे रुची वीरा यांना उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेस शिवाय एकाही पक्षाने मुस्लिम उमेदवार दिला नसल्याने मुस्लिम मते आपल्याकडेच येतील असे कॉँग्रेसला वाटत आहे.

Priyanka Gandhi’s move to revive anti-CAA agitation on the occasion of Uttar Pradesh elections

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर