प्रियांका गांधींनी गांधी परिवाराची केली भगवान राम आणि पांडवांच्या परिवाराशी तुलना!!; सोशल मीडियात झाल्या ट्रोल


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची खासदारकी कायदेशीर तरतुदीनुसार रद्द झाल्यानंतर काँग्रेसने सुरू केलेल्या संकल्प सत्याग्रह आंदोलनात प्रियांका गांधी यांनी गर्दी परिवाराची भगवान राम आणि पांडवांच्या परिवाराशी केली. पण ही तुलना करताच प्रियंका गांधींना अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रोल केले आहे. Priyanka Gandhi compared Gandhi family with bhagwan ram and pandav family

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजपचे नेते गांधी परिवाराचा संबंध परिवार वादाशी जोडतात या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडताना प्रियांका गांधी म्हणाल्या, की भगवान राम कोण होते, ते परिवारवादी होते का? पांडव परिवारवादी होते का?? भगवान राम यांना वनवासात पाठवले त्यांनी आपल्या परिवाराप्रती आणि या देशाप्रती आपले कर्तव्य निभावले. गांधी परिवारानेही या देशासाठी बलिदान केले आहे. गांधी परिवारातील व्यक्तींनी या देशातल्या लोकशाहीसाठी आपले रक्त सांडले आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. याची शरम वाटायचे कारण काय??, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.

देशात सध्यालहुकूमशहा नांदतो आहे. कुठलाही प्रश्न विचारला की त्याच्याकडे उत्तर नाही. राहुल गांधींनी फक्त अदानींवर प्रश्न विचारला तर त्यांची खासदारकी रद्द केली. पण कोणत्याही खूप कोणताही हुकूमशहा फार काळ सत्ता गाजवू शकत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा प्रियांका गांधी यांनी दिला.

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसने कालपासूनच देशातल्या विविध शहरांमध्ये आंदोलन सुरू केले आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज दिल्लीच्या सत्याग्रह संकल्पात झाली आहे आणि या सत्याग्रह संकल्पातच प्रियांका गांधींनी गांधी परिवाराची तुलना राम आणि पांडवांच्या परिवाराशी केली आहे.

त्यामुळे सोशल मीडियात अनेक जण काँग्रेसला ट्रोल करत आहेत. भगवान राम यांनी स्वतःच्या परिवाराप्रति कर्तव्य निभावले, हे खरे पण ते स्वतः सत्तेवर जाऊन बसले नाहीत, असा टोला अनेकांनी प्रियांका गांधी यांना लगावला आहे.

हेच ते भ्रष्टाचारी गांधी होते, जे भगवान राम यांना काल्पनिक ठरवत होते मग आज अचानक त्यांना रामाचा पुळका कसा आला??, असा सवाल एकाने केला आहे, या दोन बहिण भाऊंडांचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे??, असा सवाल दुसऱ्याने केला आहे.

Priyanka Gandhi compared Gandhi family with bhagwan ram and pandav family

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!