पंतप्रधानांची अन्नदात्याला नववर्षाची भेट, शेतकऱ्यांच्या खात्यावर एक जानेवारीला जमा होणार २० हजार कोटी रुपये


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकºयांना भेट दिली आहे. एक जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता शेतकऱ्यांच्या नावाने २० हजार कोटी रुपये भरले जाणार आहे.Prime Minister’s New Year’s gift , Rs 20,000 crore will be credited to farmers’ accounts on January 1

पंतप्रधानांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी नव्या वषार्तील पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला समर्पित करणार असल्याचे सांगितले. यानुसार १ जानेवारी २०२२ रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.मोदी म्हणाले, नववर्ष २०२२ चा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांना समर्पित असेन. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसान योजनेचा १० वा हप्ता जारी करण्याची संधी मिळणार आहे.

या अंतर्गत २० हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून १० कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा होईल.देशातील छोट्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून दर वर्षी सहा हजार रुपये दिले जातात.

Prime Minister’s New Year’s gift , Rs 20,000 crore will be credited to farmers’ accounts on January 1

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय