कंगना रनौतची मागणी न्यायालयाने फेटाळली, सुनावणी घेणाऱ्या न्यायालयावर भरोसा नसल्याचा केला होता आरोप


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानी प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायालयावर आपला भरवसा नाही. त्यामुळे या न्यायालयातील आपली प्रकरणे दुसऱ्या न्यायालयात वर्ग करावी अशी मागणी कंगनाने केली होती.Kangana Ranaut’s plea rejected by court, alleging lack of trust in trial court

यापूर्वी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कोटार्नंही कंगनाचा याबाबतचा अर्ज फेटाळून लावला होता. त्याच निर्णयाला कंगनानं मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले हेोते. आपली बाजू न ऐकता बेकायदेशीरपणे न्यायालयाने आपल्याविरोधात अटक वॉरंट जारी केले, असा आरोप कंगनाने या अर्जातून केला होता.



अंधेरी दंडाधिकारी कोर्टाविरोधातील ही मागणी फेटाळून लावताना सत्र न्यायालयानं कंगनाविरोधातील कारवाई कायदेशीर ठरवली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यु. बगाले यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली.कंगनाच्या वतीने अ‍ॅड. रिजवान सिद्दीकी यांनी कंगनाच्या वतीने अंधेरी न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.

मात्र याला जावेद अख्तर यांचे वकील भारद्वाज यांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रत्येकवेळी नव्या सबबी सांगून निव्वळ कोटार्चा वेळ फुकट घालवला जात असल्याचं त्यांनी कोटार्ला सांगितलं.अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात कंगनाने रिपब्लिक या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या तिच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली होती.

मात्र, या संवेदनशील प्रकरणात आपला काहीही संबंध नसताना खोटे आणि आधारहीन आरोप कंगनानं आपल्यावर केले आहेत, अशी तक्रार जावेद अख्तर यांनी केली होती. आपली विनाकारण बदनामी झाली असून आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला आहे. त्यामुळे कंगनावर मानहानीचा फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली.

याप्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगना रणौतला यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. मात्र त्यानंतरही कंगना सातत्यानं गैरहजर राहिल्यानं न्यायालयानं पुन्हा अटक वॉरंट जारी करण्यात येईल असं बजावलं होतं.

Kangana Ranaut’s plea rejected by court, alleging lack of trust in trial court

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात