विरोधकांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ही खंत व्यक्त, आरोप करणारे जास्त आणि टीकाकारांची संख्या झालीय कमी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खंत व्यक्त केली आहे आणि ती देखील त्यांच्या टीकाकारांबद्दल. माझ्या आयुष्यात मी चांगल्या टीकांना खूप महत्त्व देतो, अशा टीकाकारांबद्दल मला आदर आहे, पण दुर्दैवाने टीकाकारांची संख्या कमी झाली आहे आणि फक्त आरोप करणाºयांची जास्त, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.Prime Minister Narendra Modi’s remarks about the opposition are lamentable, with more accusers and fewer critics

राजकीय जीवनाला २० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी ओपन मॅगझिनला मुलाखत दिली. यावेळी मोदी म्हणाले, खेळ खेळणारे बरेच लोक आहेत. पण, टीका करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. संशोधन करावे लागते. अशा वेगाने धावण्याच्या काळात, लोकांकडे त्या वेळेचा अभाव असतो. त्यामुळे मला जुन्या टीकाकारांची आठवण येते.देशातील युवकांना स्वावलंबी बनण्याचा धडा देताना मोदी म्हणाले, प्रत्येक युवकाला संधी मिळणे महत्वाचे आहे, ज्यामुळे ते कुणावरही अवलंबून राहू इच्छित नाही, पण त्यासाठी त्यांना उभं करणं गरजेचं आहे.
मोदी म्हणाले की, माझा आणि राजकारणाचा दूरचाही संबंध नाही, केवळ मित्रांनी राजकारणात मला ढकललं. त्यांच्यामुळेच आज मी राजकारणात स्थिर झालो.

मला नेहमीच इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. इतरांसाठी काम करणं नेहमीच माझ्यामध्ये परिपूर्णतेची भावना निर्माण करतं. मानसिकदृष्ट्या, मी स्वत:ला शक्ती, चमक आणि ग्लॅमर च्या क्षेत्रांपासून दूर ठेवतो. त्यामुळे मी सामान्य नागरिकाप्रमाणे विचार करण्यास आणि चालण्यास कायम सक्षम राहतो. समाजसेवा ही ईश्वरची सेवा आहे.

माझा कल लहानपणापासूनच आध्यात्मिक जीवनाकडे जास्त आहे. जनसेवा ही प्रभुसेवा या तत्त्वाने मला नेहमीच प्रेरणा दिली आणि त्यामुळेच माझं सरकार राष्ट्र उभारणीसाठी मदत करतो.मी नेहमीच लोकांच्या भेटून, त्यांच्या सहवासातून विश्वास निर्माण केला आहे.

लोकांना वाटतं की, पंतप्रधान स्वत: आमच्याकडून आमच्या समस्या जाणून घेतात, आम्हाला विचारतात, आमच्यासारखे विचार करतात, त्यांना वाटतं की, मोदीही त्यांच्याच कुटुंबाचा भाग आहे. यातूनच माझा जनसंपर्क तयार झाला मोदी म्हणतात. हा विश्वास माझ्या पीआर एजन्सीने बनवलेला नसून मी मेहनत आणि घामाने मिळवला आहे.

Prime Minister Narendra Modi’s remarks about the opposition are lamentable, with more accusers and fewer critics

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण