स्वच्छ भारत मिशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन ; कचरामुक्त भारत आणि सांडपाणी शुद्धीकरणाचा निर्धार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज स्वच्छ भारत मिशन- २ चे उदघाटन झाले. देशातील शहरे कचरामुक्त करणे आणि सांडपाणी शुद्धीकरणासाठी अमृत – २ योजनेचा त्यांनी प्रारंभ केला. Inauguration of Swachh Bharat Mission by Prime Minister Narendra Modi; Determination of waste free Indian City and wastewater treatment

स्वच्छ भारत मिशन आणि अमृत योजने अंतर्गत शहरे कचरामुक्त करण्याचे ध्येय बाळगले आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापन आणि जन सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. नाल्याचे घाण पाणी थेट नदीत मिसळू नये,याची काळजी घेण्यात आली आहे.

लहान मुलांना स्वच्छतेचे धडे देताना मोदी म्हणाले, टॉफी- चॉकलेट खाल्यानंतर रस्त्यावर त्याचे रॅपर फेकू नका, खिशात ठेवा नंतर त्याची विल्हेवाट लावा तसेच रस्त्यावर लघुशंका करू नका, असा सल्ला मोठ्यांनी मुलांना द्यायला हवा. तरुण त्यासाठी पुढाकार घेत आहेत. काही जण काचऱ्यापासून संपत्ती निर्माण करतात. तर काही त्याबाबत जागृती करतात. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करणे काळाची गरज आहे.

स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.० आणि अमृत २.० चा हा दुसरा टप्पा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम आंबेडकर केंद्रात आयोजित करण्यात आला आहे. त्यांचा असा विश्वास होता की, शहरी विकास समानतेसाठी महत्त्वाचा आहे, असे मोदी यांनी सांगितले.

स्वच्छतेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरांमधील पर्वताप्राय कचऱ्यांच्या ढिगावर प्रक्रिया केली जाईल आणि त्यांची विल्हेवाट लावली जाईल. दिल्लीत कचऱ्याचे पर्वत बऱ्याच काळापासून आहेत. तो देखील काढण्याची मी वाट पाहत आहे.

देशात रोज ७० टक्के कचऱ्याची विल्हेवाट

ते म्हणाले, आज भारत दररोज सुमारे १ लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करत आहे. २०१४ मध्ये जेव्हा आम्ही मोहीम सुरू केली तेव्हा २० % पेक्षा कमी कचऱ्यावर प्रक्रिया केली जात होती. आज आपण दररोज सुमारे ७० % कचऱ्यावर प्रक्रिया करत आहोत. ते १००%पर्यंत नेले पाहिजे.

Inauguration of Swachh Bharat Mission by Prime Minister Narendra Modi; Determination of waste free Indian City and wastewater treatment

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात