संत रामानुजाचार्य : स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी जगातील सर्वात उंच आसनस्थ दुसरी मूर्ती!!


प्रतिनिधी

रामनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैदराबाद दौऱ्यावर असून त्यांनी 216 फूट उंचीची स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी देशाला समर्पित केला आहे. ही मूर्ती 11 व्या शतकातील वैष्णव संत रामानुजाचार्य यांची आहे. त्यांच्या जन्माला 1 हजार वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या हस्ते वैष्णव संतांना हा महान सन्मान देण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हा बसलेल्या स्थितीतील दुसरा सर्वात उंच मूर्ती असल्याचे सांगण्यात आले आहे.Prime Minister Narendra Modi inaugurates the 216-feet tall ‘Statue of Equality

सुमारे 1 हजार कोटी रुपये खर्चून ती तयार करण्यात आली आहे. हे बनवण्यासाठी भरपूर सोने, चांदी, तांबे, पितळ यांचा वापर करण्यात आला आहे. या भव्य मूर्तीबरोबरच तळमजल्यावर 63,444 चौरस फूट जागेत एक विशाल फोटो गॅलरीही तयार करण्यात आली आहे, जिथे संत रामानुजाचार्यांचे संपूर्ण जीवन पाहायला मिळणार आहे. संत रामानुजाचार्य यांच्या मूर्ती जवळ सर्व देशांचे ध्वज लावण्यात येणार आहेत. संत रामानुजाचार्य यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही जाती-धर्म-रंगाच्या नावावर भेदभाव केला नाही, हा यामागचा हेतू आहे.

त्यामुळे या विशाल मूर्तीचे पंतप्रधान मोदींनी अनावरण केले आहे. प्रथम त्यांनी मंदिरात पूजा केली, सर्व परंपरा पूर्ण विधी पूर्ण केल्या आणि नंतर ही 216 फूट उंचीची मूर्ती देशाच्या नावासाठी समर्पित केली.

पुतळ्याचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात जोडून संत रामानुजाचार्य यांना अभिवादन केलं. यावेळी साधूसंत आणि मोजकेच पाहूणे उपस्थित होते. रामानुजाचार्य स्वामींचं हे एक हजारावं जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांची जगातील दुसरी भव्य मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आली आहे.

Prime Minister Narendra Modi inaugurates the 216-feet tall ‘Statue of Equality

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात