सार्वजनिक वाहतुकीची गती वाढविणार, गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्प रखडवले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अनेक वर्षांपासून एक विचार आपल्या देशावर वर्चस्व गाजवत होता की गरीब आणि मध्यमवर्गीय वापरत असलेल्या साधनांमध्ये करू नये. त्यामुळे भारतातील सार्वजनिक वाहतुकीची गती मंद होती. पण आता भारत हा जुना विचार मागे टाकून पुढे जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.Prime Minister Narendra Modi has accused the government of stalling projects for the last several years

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे आणि दिवा यांना जोडणाºया दोन अतिरिक्त रेल्वे लाईन्स (5व्या आणि 6व्या लाईन्स) राष्ट्राला समर्पित केल्या. मागील सरकारांवर निशाणा साधताना पंतप्रधानांनी अनेक वर्षांपासून प्रकल्प लटकत असल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, या प्रकल्पाची पायाभरणी 2005 मध्ये झाली.



2015 मध्ये ते पूर्ण व्हायचे होते, परंतु 2014 पर्यंत विविध कारणांमुळे ते रखडले. त्यानंतर आम्ही त्यावर जलदगतीने काम करून जे प्रश्न आहेत ते सोडवले. अनेक आव्हाने असतानाही, आमच्या कामगारांनी आणि आमच्या अभियंत्यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. डझनभर पूल बांधले गेले, उड्डाणपूल बांधले गेले आणि बोगदे तयार केले गेले.

राष्ट्र उभारणीच्या अशा बांधिलकीला मी मनापासून सलाम करतो. 21 व्या शतकातील भारत बनवण्यासाठी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टरप्लॅन आणला आहे. या नव्या रेल्वे मागार्मुळे मुंबईकरांच्या जीवनात नवा बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नवीन रेल्वे मागार्मुळे मुंबईच्या कधीही न थकवणाºया वेगाला आणखी चालना मिळणार आहे.

कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन आहे. देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागातून येणारी वाहतूक कल्याणला जोडते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाते. कल्याण आणि सीएसटीएम दरम्यानच्या चार रेल्वे मार्गांपैकी, दोन ट्रॅक धीम्या लोकल गाड्यांसाठी आणि दोन जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात आले. त्यानंतर उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्या वेगळ्या करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे नियोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान म्हणाले की, ही नवीन लाईन सुरू झाल्यामुळे मुंबईतील लोकांना थेट 4 फायदे मिळतील. आता लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असतील. राज्यातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना लोकलच्या पासिंगसाठी थांबावे लागणार नाही. कल्याण ते कुर्ला विभागात मेल एक्सप्रेस गाड्या कोणत्याही अडथळ्याशिवाय धावू शकतील. रविवारी मेगाब्लॉकमुळे कळवा, मुंब्रा येथील नागरिकांच्या अडचणी दूर होणार आहेत.

आजपासून सेंट्रल लाईनवर ३६ नवीन लोकल धावत आहेत. त्यापैकी बहुतांश एसी गाड्या आहेत. स्थानिक आधुनिकीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे. गेल्या 7 वर्षांत मुंबईतही मेट्रोचा विस्तार झाला आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असेही मोदी यांनी सांगितले.

आमच्या सरकारने बदललेली दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वेवर स्वत:चा विश्वास. सात-आठ वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात असलेल्या रेल्वे कारखान्यांबाबत अत्यंत खेदजनक उदासिनता होती. हे कारखाने इतके आधुनिक डबे बनवू शकतात, याची कल्पनाही यापूर्वी कोणीही केली नसेल. मात्र आज वंदे भारत ट्रेन आली असून या कारखान्यांमध्ये व्हिस्टा डमार्कोज बनवले जात आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

ठाणे आणि दिवा यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग सुमारे 620 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले असून त्यात 1.4 किमी लांबीचा रेल्वे उड्डाणपूल, तीन मोठे पूल, 21 छोटे पूल यांचा समावेश आहे. या मार्गांमुळे मुंबईतील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीतील तसेच उपनगरीय रेल्वे वाहतुकीतील व्यत्यय मोठ्या प्रमाणात दूर होईल. यासह 36 नवीन उपनगरीय गाड्याही शहरात धावणार आहेत.

Prime Minister Narendra Modi has accused the government of stalling projects for the last several years

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात