पंतप्रधान मोदी कोरोना लसीकरणाबाबत मागासलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेणार, राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार


बुधवारी( आज ) पंतप्रधान या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लसीकरण कमी होण्याच्या कारणांचा आढावा घेतील. Prime Minister Modi will review the backward districts regarding corona vaccination and Chief Ministers of the states will also be present


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील कोरोना लसीकरणात मागे राहिलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. देशातील 13 राज्यांमधील ४८ जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये कोरोना लसीकरणाचा पहिला डोस ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलेला नाही.

बुधवारी( आज ) पंतप्रधान या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लसीकरण कमी होण्याच्या कारणांचा आढावा घेतील.या बैठकीला संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, या बैठकीत त्या जिल्ह्यांचा समावेश केला जाईल जिथे ५० टक्क्यांहून कमी लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि फार कमी लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.



या बैठकीत पंतप्रधान या सर्व जिल्ह्यांमध्ये कमी लसीकरणाच्या कारणांचा आढावा घेतील तसेच त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करतील.या जिल्ह्यांमध्ये दिल्लीचा वायव्य जिल्हा, हरियाणातील नूह, बिहारमधील अररिया आणि छत्तीसगडमधील नारायणपूर यांचा समावेश आहे.

यासह झारखंडमधील नऊ जिल्ह्यांमध्ये पाकूर, साहेबगंज, गढवा, देवघर, पश्चिम सिंगभूम, गिरिडीह, लातेहार, गोड्डा आणि गुमला यांचा समावेश आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी सहा जिल्हे, मणिपूर आणि नागालँडमधील प्रत्येकी आठ, मेघालयातील चार आणि तामिळनाडू, मिझोराम आणि आसाममधील प्रत्येकी एक जिल्हे आहेत.

Prime Minister Modi will review the backward districts regarding corona vaccination and Chief Ministers of the states will also be present

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात