मारुती सुझुकीच्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत होणार एक सप्टेंबरपासून वाढ, उत्पादन खर्चात वाढ झाल्याने निर्णय

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्पादन प्रक्रियेच्या खर्चात झालेली वाढ झाल्याने मारुती सुझुकी इंडिया आपल्या विविध मॉडेल्सच्या किंमतीत सप्टेबर २०२१ पासून वाढ करणार आहे. किंमती कशा प्रमाणात वाढणार आहेत याबाबतची माहिती मात्र कंपनीने अजून उघड केलेली नाहीPrices of all Maruti Suzuki models to be hiked from September 1

मारुती सुझुकीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये किंमत वाढ होणार असल्याची घोषणा केली होती. ही किंमतवाढ आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीत होणार असल्याचे सांगितले होते. 

आपल्या अधिकृत वक्तव्यात मारुती सुझुकी इंडियाने सांगितले की, गेल्या काही वषार्तील आमच्या गाड्यांच्या किंमतीवर उत्पादन खर्च वाढल्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या गाड्यांच्या किंमतीत थोडी वाढ करत आहोत. ही किंमतवाढ जवळपास सर्व मॉडेल्सला सप्टेंबर २०२१ पासून लागू करण्याचे नियोजन आहे.

सध्या, मारुती सुझुकीने आधीच आपल्या हॅचबँक स्विफ्टची किंमत वाढवली आहे. याचबरोबर त्यांच्या सर्व सीएनजी गाड्याच्या किंमती वाढवल्या आहेत. या किंमती १५ हजार पासून वाढवल्या आहेत. या किंमती गाड्यांचे व्हिरियंट आणि मॉडेल्सनुसार वेगवेगळ्या आहेत. आता पेट्रोल मॉडेल्सच्या किंमती वाढणार आहेत.

मारुती सुझुकीने सप्टेंबर -2021 मध्ये सर्व मॉडेल्सच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पुढील महिन्यात मारुती सुझुकीच्या सर्वच गाड्या वाढलेल्या किंमतीत मिळतील. यावर्षभरात तब्बल चार वेळा मारुती सुझुकीच्या कारच्या किंमती वाढल्या आहेत.यापूर्वी जुलैमध्ये वाढल्या होत्या. मारुती सुझुकीने सेलेरियो आणि स्विफ्ट वगळता एप्रिल 2021 मध्येही आपल्या बहुतेक मॉडेल्सच्या किमती 22,500 रुपयांपर्यंत वाढविल्या होत्या.

भारतीय बाजारात मारुती सुझुकीची जबरदस्त पकड आहे. जुलै महिन्यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप -10 कारच्या यादीत 8 कार एकट्या मारुतीच्या होत्या. ह्युंदाईची एकमेव क्रेटा टॉप -10 मध्ये स्थान मिळवू शकली.

जुलैमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात मारुती सुझुकी वॅगनआर ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. जुलै महिन्यात मारुती वॅगनआरच्या एकूण 22,836 युनिट्सची विक्री झाली. जुलैमध्ये मारुती स्विफ्टची सर्वाधिक विक्री झाली. याशिवाय ब्रेझा, अल्टो, एस-प्रेसो, इको आणि एर्टिगालाही प्रचंड मागणी आहे.

Prices of all Maruti Suzuki models to be hiked from September 1

महत्त्वाच्या बातम्या