सचिन वाझेला भीती कोठडीतील मृत्यूची, फादर स्टॅन स्वामीप्रमाणे मृत्यू येऊ नये म्हणून मागितले तातडीचे उपचार


विशेष प्रतिनिधी

मुंबई : फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे तुरुंगातील कोठडीतच मृत्यू होऊ नये अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे आपल्याला तातडीने योग्य वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझेने एनआयए न्यायालयात सांगितले.Sachin Waze fears death in cell, seeks immediate treatment to prevent death like Father Stan Swamy

शहरी नक्षलवाद प्रकरणातील 84 वर्षीय आरोपी फादर स्टॅन स्वामी याचा काही महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सचिन वाझेची पुन्हा कस्टडी मागणारा अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला.



याप्रकरणात झालेल्या अटकेनंतर सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला बडतर्फ सहायक वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वाझेसह पोलिस निरीक्षक सुनील मानेची पुढील चौकशी करण्यासाठी पुन्हा कोठडी देण्याची मागणी करत या प्रकरणाचा तपास करणाºया एनआयएने न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी हा अर्ज फेटाळून लावला.

सचिन वाझेने आपल्या प्रकृतीच्या कारणावरून न्यायालयाकडे केलेला अर्ज स्वीकारण्यात आला. सचिन वाझेला वैद्यकीय उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात नेण्याचे निर्देश न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. सचिन वाझेला हृदयरोगाचा त्रास असून उपचारांसाठी त्याने अर्ज केला होता.

Sachin Waze fears death in cell, seeks immediate treatment to prevent death like Father Stan Swamy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात