prakash javadekar : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आरोपांवर आता भाजपने पलटवार केला आहे. देशातील दुसर्या लाटेला पंतप्रधानांची ‘नौटंकी’ जबाबदार असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, जनतेने त्यांची नौटंकी केव्हाच बंद केली आहे. prakash javadekar reply to Rahul Gandhi, says first congress did not trust on vaccine they spread confusion
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आरोपांवर आता भाजपने पलटवार केला आहे. देशातील दुसर्या लाटेला पंतप्रधानांची ‘नौटंकी’ जबाबदार असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, जनतेने त्यांची नौटंकी केव्हाच बंद केली आहे.
जावडेकर म्हणाले, “जेव्हा पंतप्रधान देशातील जनतेसमवेत कोविडचा सामना करत आहेत, तेव्हा हे (राहुल गांधी) अशा प्रयत्नांसाठी नौटंकी शब्द वापरतात. हा देश आणि जनतेचा अपमान आहे. आम्ही त्यांची नौटंकी अशा प्रकारचा शब्द वापरणार नाही, कारण जनतेने त्यांची नौटंकी केव्हाच बंद केली आहे.”
प्रकाश जावडेकर म्हणाले, “पहिल्यांदा कॉंग्रेसला लसीवर विश्वास नव्हता. त्यांच्या एका सहकाऱ्याने याला भाजपची लस म्हटले. त्यांनी या लसीबद्दल संभ्रम पसरविला. राहुलजी समजून घ्या, लसीचा विरोध तुम्हीच केला. लस गेल्या वर्षापासून तयार आहे. राहुल गांधी सांगतात की, 2024 पर्यंत प्रत्येकाला लस दिली जाईल. आमचे म्हणणे आहे की, या वर्षाच्या अखेरीस प्रत्येकाला लसी दिली जाईल. डिसेंबरपर्यंत 108 कोटी लोकांचे लसीकरण होईल.”
कॉंग्रेसवर हल्ला चढवत केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “राहुलजी, जर तुम्हाला लसीची चिंता वाटत असेल तर आधी तुमच्या सरकारमधील राज्यांकडे लक्ष द्या. बलात्कार राजस्थानमध्ये होत आहे. अलीकडेच एक अम्ब्युलन्स बलात्कारासाठी वापरण्यात आली होती. एका महिला खासदारांवर कॉंग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला. त्यांनी देशात उपदेश देण्याऐवजी आपल्या राज्यांत लक्ष केंद्रित करावे.”
prakash javadekar reply to Rahul Gandhi, says first congress did not trust on vaccine they spread confusion
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App