Prakash Javadekar : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष आता नकारात्मक राजकारणावर उतरला आहे. कॉंग्रेस असे नकारात्मक राजकारण का करत आहे, असा सवाल त्यांनी सोनिया गांधींना केला आहे. त्याचबरोबर त्यांनी कॉंग्रेस नेते कमलनाथ यांच्या विधानावरही सोनिया गांधींना जाब विचारला आहे. Prakash Javadekar criticizes Congress Over Ex CM Kamal Nath Indian Corona Remark
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष आता नकारात्मक राजकारणावर उतरला आहे. कॉंग्रेस असे नकारात्मक राजकारण का करत आहे, असा सवाल त्यांनी सोनिया गांधींना केला आहे. त्याचबरोबर त्यांनी कॉंग्रेस नेते कमलनाथ यांच्या विधानावरही सोनिया गांधींना जाब विचारला आहे.
प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, “सुरुवातीला कोव्हॅक्सिनला ‘भाजपाची व्हॅक्सिन’ असे संबोधले जात होते. आता सर्वोत्कृष्ट कोव्हॅक्सिन असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणूनच आता त्यांनी ‘ट्रॅव्हल बॅन’ हा नवा शब्द जोडला आहे. पण डब्ल्यूएचओने असा कोणताही निर्णय घेतला नाही. कॉंग्रेस पक्ष देशातील कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत करण्याचे काम करत आहे. लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण झाला आहे. ही जबाबदार विरोधकांची भूमिका नाही. कॉंग्रेस आता नकारात्मक राजकारणावर उतरली आहे. सोनिया कॉंग्रेस असे नकारात्मक राजकारण का करीत आहे हे त्यांनी सांगायला हवे.”
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत म्हटले होते की, ‘जगभरात भारताची ओळख इंडियन कोरोनामुळे झाली आहे. आम्ही म्हणायचो की चिनी कोरोना आहे. जानेवारी 2020 मध्ये असे म्हटले गेले की हा कोरोना चीनची आहे. चिनी प्रयोगशाळेत बनवलेला. आज आपण कुठे पोचलो आहोत? आज जगभरात इंडियन कोरोना आहे, इंडियन कोरोना.” कमलनाथ यांच्या या विधानामुळे राजकीय वादळ उठले आहे. आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोनिया गांधी यांना या विधानावर उत्तर देण्यास सांगितले आहे.
Prakash Javadekar criticizes Congress Over Ex CM Kamal Nath Indian Corona Remark
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App