भारतात मेअखेर मिळणार Sputnik V चे 30 लाख डोस, ऑगस्टपासून देशात उत्पादनाला सुरुवात

India Will Get 30 Lakh Doses Of Sputnik V Russian Corona Vaccine By May End

Sputnik V : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये सातत्याने लसींची मागणी वाढत आहे. दरम्यान, रशिया लवकरच स्थानिक पातळीवर स्पुतनिक व्हीची लस तयार करण्याचे तंत्रज्ञान भारताला देणार आहे. ऑगस्टपासून भारतात लसीचे उत्पादन सुरू होईल, असे रशियामधील भारतीय राजदूत डी. बाला वेंकटेश वर्मा यांनी म्हटले आहे. India Will Get 30 Lakh Doses Of Sputnik V Russian Corona Vaccine By May End


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशभरात राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेमध्ये सातत्याने लसींची मागणी वाढत आहे. दरम्यान, रशिया लवकरच स्थानिक पातळीवर स्पुतनिक व्हीची लस तयार करण्याचे तंत्रज्ञान भारताला देणार आहे. ऑगस्टपासून भारतात लसीचे उत्पादन सुरू होईल, असे रशियामधील भारतीय राजदूत डी. बाला वेंकटेश वर्मा यांनी म्हटले आहे.

वर्मा म्हणाले की, मे महिन्याच्या अखेरीस भारतात 30 लाखाहून अधिक डोस पुरवण्यात येतील आणि जूनमध्ये हा पुरवठा 50 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, “सुरुवातीच्या काळात लसीच्या 85 कोटी डोसचे उत्पादन करण्याची भारताची योजना आहे.”

डॉ. रेड्डीजशी उत्पादनाचा करार

रशियन लस उत्पादकांनी भारतातील डॉ. रेड्डीजशी करारावर स्वाक्षरी केली आहे आणि यापूर्वीच त्यांनी दोन लाखांपेक्षा जास्त डोस भारतात पुरवले आहेत. वर्मा म्हणाले, “स्पुतनिक व्हीचे आधी दीड लाख डोस आणि नंतर 60 हजार डोस भारतात पुरविण्यात आले आहेत.”

देशात सध्या तीन लसींना मान्यता

स्पुतनिक-व्ही ही लस रशियाकडून आयात करण्यास मान्यता देण्यात आली आहे, परंतु अद्याप देशात ती उपलब्ध नाही. लसीच्या आयातीत डोसची जास्तीत जास्त किरकोळ किंमत सध्या 948 रुपये आहे, असे कंपनीने म्हटले आहे. यात प्रति डोस 5 टक्के जीएसटी जोडल्यास ही किंमत 995.4 रुपये होते. भारतात कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड आणि स्पुतनिक-व्ही या तीन लसींना मान्यता मिळालेली आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) कडून आयात होणाऱ्या लसीची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली. त्याचा पहिला डोस रेड्डीजच्या प्रयोगशाळेतील वरिष्ठ कार्यकारी दीपक सपरा यांना देण्यात आला होता.

India Will Get 30 Lakh Doses Of Sputnik V Russian Corona Vaccine By May End

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात